पौगंडावस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पौगंडावस्था ही बालपणापासून पूर्ण स्त्री किंवा पुरूष होण्याच्या मधील संक्रमणाचा काळ असते. यावेळी मुलींच्या आणि मुलांच्या शरीरातील अंत:स्त्रावांमध्ये बदल होत असतात. त्याच बरोबर शारीरिक, मानसिक आणि वैचारिक बदलही होत असतात. व्यक्ती आक्रमक बनते, आपल्या रुपाबद्दल अधिकाधिक जागरुक होते व स्वभाव हळवा होतो.

मुलींत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीबीजे निर्माण होणे व पाळी सुरू होणे हे सर्व होत असतानाच स्तन वृद्धि आणि इतर लैंगिक विकासही होत असतो. यावेळी शरीरात आकर्षक बदल होणे, लैंगिक जाणीवा विकसित होणे, भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटणे, समलिंगी व्यक्तीबद्दल इर्षा वाटणे अशीही प्रगती होत असते.

इंग्रजीत प्युबर्टी हा शब्द आलाय तो लॅटीनमधल्या "प्युबेस' या शब्दावरून. प्युबेस म्हणजे जननेंद्रियावरील केस. हे केस उगवू लागले की व्यक्ती वयात आली असं पूर्वी मानण्यात येत असे. याबरोबरच पुरुषाचा आवाज फुटणे आणि त्याला दाढी-मिशा उगवणे ही चिन्हंही दिसतात, तर स्त्रीची मासिक पाळी सुरू होते आणि स्तन वाढू लागतात..[१] मुलांचे आवाज फुटतात (घोगरे/पुरुषी) होतात. शिश्नाची वाढ होऊ लागते

अनुक्रमणिका

[संपादन] लैंगिक शिक्षण

बऱ्याच मुलांची वा मुलींची या नैसर्गिक बदलांशी जुळवून घेताना दमछाक होते. कारण याबरोबर पालकांची मानसिकता, त्यांची मते, मित्रमैत्रिणींचे स्वभाव, जीवनाविषयक दृष्टीकोन अशा सर्व गोष्टी इथे संलग्न असतात. मुले संभ्रमित वा गोंधळून जाऊ नयेत, करीअरची दिशा भटकू नये म्हणून विश्वासार्ह लैंगिक शिक्षण हे योग्य स्त्रोतातून मिळेल याची पालकांनी खात्री करून घ्यावी असा आधुनिक वैद्यकीय दृष्टीकोन आहे.

[संपादन] सोहळे आणि विधी

[२]

[संपादन] हेही पाहा

[संपादन] संदर्भ

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये