पैठण
| ?पैठण महाराष्ट्र • भारत |
|
|
|
|
| गुणक: | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| क्षेत्रफळ • उंची |
• ४५८ m (१,५०३ ft) |
| लोकसंख्या | (२००१) |
| कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• • +0२४३१ • MH - २० |
गुणक: पैठण
उच्चार (सहाय्य·माहिती) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याचे ते मुख्य ठिकाण आहे. औरंगाबादेपासून ५० किलोमीटर अंतरावर गोदावरीकाठी ते वसले आहे. पैठण हे तेथील संत एकनाथांची समाधी, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान तसेच पैठणी साडी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. कसे याल-- http://santeknath.org/kase%20yal.html
अनुक्रमणिका |
इतिहास[संपादन]
पैठणी हे नाव ज्या ठिकाणावरुन पडले ते पैठण महाराष्ट्राच्या इतिहासात गेली २५०० वर्ष स्वतःचे वेगळेपण राखून आहे. हे गांव प्राचीन कालापासून 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते. पूर्वी(मूळ नाव "प्रतिष्ठान") ही सातवाहन राजांची राजधानी होती. त्या काळापासून अगदी आत्ताआत्तापर्यंत संस्कृत आणि धर्मशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या इथल्या पंडितांनी दिलेला धर्मनिर्णय अखेरचा मानला जाई. याशिवाय पैठणचे आणखी एक महत्त्व म्हणजे महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी काही काळ पैठणला राहिले होते. पण या सगळ्यांपेक्षा पैठण आपल्या लक्षात राहते ते एकनाथ महाराजांमुळे. १६ व्या शतकात झालेल्या एकनाथ महाराजांची पैठण ही जन्मभूमी आणि कर्मभूमी. एकनाथ महाराजांचा वाडा पैठणमध्ये होता. या वाड्याचेच मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे.
एकनाथांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांढुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे. पाण्याचा तो हौदही या वाड्यात अजून आहे. मंदिराच्या गाभाऱ्याध्ये एकनाथांच्या पूजेतला बाळकृष्ण ठेवला आहे. या वाड्याला आतले नाथ आणि गावाबाहेर गोदावरीच्या पात्रात ज्या ठिकाणी एकनाथांनी देह ठेवला त्या ठिकाणाला बाहेरचे नाथ असं गावकरी म्हणतात. तिथे एकनाथांचे समाधिमंदिर बांधण्यात आले आहे.
फाल्गुन वघ षष्ठीला नाथषष्ठी म्हणतात. ही एकनाथ महाराजांची पुण्यतिथी. यानिमित्त सहा दिवसांचा मोठा उत्सव होतो. अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सव संपतो.
गोदावरीच्या काळावर नागतीर्थ म्हणून एक ठिकाण आहे. झानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले ते याच ठिकाणी. इथे रेड्याची मोठी मूर्ती आहे.
उद्योगधंदे[संपादन]
प्रेक्षणीय स्थळे[संपादन]
- सातवाहन राजांच्या महालाच्या खाणखुणा, कोरीव खांब वगैरे असणाऱ्या या प्रासादाच्या आवारात एक विहीर आहे. या विहिरीला शालिवाहनाची विहीर म्हणतात.
- जायकवाडी धरण, गोदावरी नदीवरील जायकवाडी हे धारण पैठण जवळच आहे.
प्रसिद्ध व्यक्ती[संपादन]
१. संत भानुदास महाराज २. संत एकनाथांचा जन्म पैठणला झाला. ३. संत गावबा ४. क्रुष्णदयार्णव ५. कवी अम्रुतराय ६. शन्करराव चव्हाण ७. भय्यासाहेब महाराज गोसावी ८. बाळासाहेब पाटील ९. योगीराज महाराज पैठणकर,( गोसावी)
संदर्भ[संपादन]
ठळक मजकूर==बाह्य दुवे=
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |