पृथ्वी क्षेपणास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पृथ्वी क्षेपणास्त्र

पृथ्वी क्षेपणास्त्र
प्रकार पृष्ठभाग ते पृष्ठभाग निम्न पल्ला प्रक्षेपास्त्र
राष्ट्र भारत
सेवेचा इतिहास
सेवेत १९९४
वापरकर्ते भारतीय लष्कर, भारतीय वायुदल, भारतीय नौदल
संबंधित युद्धे
तपशील
वजन ४४०० किलो
लांबी ९ मीटर


"पृथ्वी" हे भारतीय सैन्याचे "पृष्ठभाग ते पृष्ठभाग" (Surface to Surface) निम्न पल्ला प्रक्षेपास्त्र (Short Range Ballistic Missile) आहे. हे प्रक्षेपास्त्र भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने

विकास व बरच काही[संपादन]

भारत शासनाने वेगवेगळी युद्ध क्षेपणास्त्रे व पृष्ठभाग ते आकाश या मालिकेतील क्षेपणास्त्रांवरील स्वावलंबनासाठी १९८३ साली "एकीकृत मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम" सुरू केला. या अंतर्गत विकसित केलेले पृथ्वी हे पहिले प्रक्षेपास्त्र आहे. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने याआधी "प्रोजेक्ट डेव्हिल" अंतर्गत सोविएत रशियाच्या एसए-2 पृष्ठभाग ते आकाश या क्षेपणास्त्राची उलट अभियांत्रिकी केली होती. "पृथ्वी"ची प्रणोदन प्राद्योगिकी ही एसए-2 पासुन उत्पादित केली असल्याचे मानले जाते. या प्रक्षेपास्त्राच्या प्रारूपांमध्ये स्थायू अथवा द्रव, अथवा या दोन्ही प्रकारची इंधने वापरली जातात. युद्धभूमीवरील वापरासाठी विकसित केलेले हे प्रक्षेपास्त्र सामरिक उपयोगासाठी स्फोटक शीर्षावर अण्वस्त्रेसुद्धा वाहून नेऊ शकते.

प्रारूपे[संपादन]

पृथ्वी प्रक्षेपास्त्र प्रकल्पामध्ये भारतीय सेना, नौसेना व वायु सेना या तिन्ही दलांसाठी असलेली "पृथ्वी"ची प्रारूपे अंतर्भूत करण्यात आलेली आहेत. सुरुवातीच्या एकीकृत मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत असलेल्या प्रकल्पामध्ये पृथ्वी प्रक्षेपास्त्राच्या संरचना रूपरेषेत खालील प्रारूपे अंतर्भूत आहेत.

  • पृथ्वी - १ (एसएस- १५०) - भारतीय सेनेसाठी (१,००० किलोच्या स्फोटक शिर्षासह १५० किलोमीटर लांबीचा पल्ला)
  • पृथ्वी - २ (एसएस- २५०) - भारतीय वायुसेनेसाठी (५०० किलोच्या स्फोटक शिर्षासह २५० किलोमीटर लांबीचा पल्ला)
  • पृथ्वी - ३ (एसएस- ३५०) - भारतीय नौसेनेसाठी (५०० किलोच्या स्फोटक शिर्षासह ३५० किलोमीटर लांबीचा पल्ला)
  • धनुष - बातमीनुसार धनुष हे भारतीय नौसेनेसाठीचे युद्धनौकेवरून डागण्यात येऊ शकणारे प्रारूप आहे. काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार धनुष ही संतुलित मंच असलेली अशी रचना आहे की ज्यावरून पृथ्वी - २ व पृथ्वी - ३ अशी दोन्ही प्रक्षेपास्त्रे युद्धनौकेवरून डागण्यात येऊ शकतील. तर काही सूत्रांच्या मते धनुष हे पृथ्वी - २ या प्रक्षेपास्त्राचे प्रारूप आहे.

वर्षानुवर्षे ही वैशिष्ठ्ये अनेक बदलांमधून गेली. भारताने लष्करी वापराकरिता तयार केलेल्या या वर्गातील कुठल्याही क्षेपणास्त्राला पृथ्वी या कूटनामाने ओळखले जाते. मात्र नंतरच्या विकसनशील प्रारूपांना पृथ्वी-२ आणि पृथ्वी-३ या नावाने ओळखले जाते.

वर्णन[संपादन]

पृथ्वी १

पृथ्वी १ हे १००० किलो स्फोटक शिर्षाची क्षमता व १५० किलोमीटरचा पल्ला असलेले भूपृष्ठ ते भूपृष्ठ क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राची अचूकता १०-५० मीटर असून हे ऊर्ध्व परीवाहक पट्ट्यावरून डागण्यात येऊ शकते. या वर्गातील पृथ्वी क्षेपणास्त्र भारतीय सेनेत १९९४ साली नियुक्त करण्यात आले.

पृथ्वी २

पृथ्वी २ हे प्रक्षेपास्त्र २५० किलोमीटरच्या वाढीव पल्ल्यासह १००० किलोचे स्फोटक शीर्ष असलेले क्षेपणास्त्र आहे. पृथ्वी २ हे एकस्तरीय द्रव इंधन वापरणारे क्षेपणास्त्र आहे व त्याची लांबी- ९ मीटर व्यास- १.१० मीटर, वजन-४००० ते ४६०० किलो आहे. हे क्षेपणास्त्र भारतीय वायु दलाच्या प्रार्थमिक वापराकरिता तयार केले गेले. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी २७ जानेवारी १९९६ रोजी केली गेली व याच्या विकसित आवृत्त्या २००४ मध्ये पूर्ण करण्यात आल्या. सध्या पृथ्वी २ या क्षेपणास्त्राची भारतीय वायु दलातील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सध्याच घेण्यात आलेल्या एका चाचणीत हे क्षेपणास्त्र ३५० किलोमीटरच्या वाढीव पल्ल्यासह व सुधारित 'जडत्व परिभ्रमण सहाय्यता प्राप्त' सह डागण्यात आले. या प्रक्षेपास्त्रामध्ये प्रक्षेपास्त्र-विरोधी क्षेपणास्त्रांना चकवण्याची वैशिष्ठ्ये आहेत. बातम्यांच्या अनुसार या प्रक्षेपास्त्रच पल्ला आता ३५० km पर्यंत वाढवण्यात आला आहे.

पृथ्वी ३

पृथ्वी ३ वर्ग (कूट नाम "धनुष") हे द्विस्तरीय नौका ते पृष्ठभाग प्रक्षेपास्त्र आहे. पहिला स्तर १६ मेट्रीक टन बल (157 kN) जोर मोटरचा असून त्यात स्थायुरूपी इंधन वापरले जाते. दुसऱ्या स्तरामध्ये द्रवरूपी इंधन वापरले जाते. प्रक्षेपास्त्र १००० किलोचे स्फोटक शीर्ष ३५० किमी पर्यंत, ५०० किलोचे स्फोटक शीर्ष ६०० किमी पर्यंत आणि २५० किलोचे स्फोटक शीर्ष ७५० km पर्यंत वाहून नेऊ शकते. धनुष प्रणालीमध्ये संतुलित मंच (धनुष्य) आणि प्रक्षेपास्त्र (बाण) हे घटक अंतर्भूत आहेत. अंदाजानुसार धनुष हे पृथ्वी प्रक्षेपास्त्राचेच एक सागरी वापरासाठीच्या योग्यतेचे एक विशिष्ट रूप आहे. "धनुष" डागण्यासाठी जलस्थिर मंचाची आवश्यकता आहे. याचा छोटा पल्ला याच्या गुणांविरुद्ध असल्याकारणाने हे प्रक्षेपास्त्र फक्त शत्रूच्या विमानवाहू नौकेविरोधात अथवा बंदराविरोधात वापरता येते. या प्रक्षेपास्त्राची पृष्ठीय नौकांवरून अनेक वेळा चाचणी घेण्यात आली आहे.

पृथ्वी ३ हे प्रक्षेपास्त्राची चाचणी सर्वप्रथम सुकन्या वर्गीय गस्ती नौकेच्या आय.एन.एस. सुभद्रा वरून २००० साली घेण्यात आली.या नौकेच्या सुधारित, अधिक मजबूत केलेल्या Helicopter deck वरून या प्रक्षेपास्त्राची चाचणी घेण्यात आली. २५० किमी पल्ला असलेल्या प्रारूपाची पहिली चाचणी अंशतः यशस्वी झाली. याची पूर्ण सामरिक चाचणी सन २००४ मध्ये पूर्ण झाली. नंतरच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आय.एन.एस. राजपूत वरून याच प्रक्षेपास्त्राच्या ३५० km पल्ला असलेल्या प्रारूपाची भूपृष्ठावरील लक्ष्य अचूकपणे साधून यशस्वी चाचणी घेण्यात आली. याच प्रक्षेपास्त्राची चाचणी पुन्हा एकदा १३ डिसेंबर २००९ रोजी आय.एन.एस. सुभद्रावरून चांदीपूरच्या एकल परीक्षण क्षेत्रापासून ३५ km लांब समुद्रात उभी करून यशस्वीरीत्या घेण्यात आली. ही या प्रक्षेपास्त्राची सहावी चाचणी होती.[१]

संदर्भ[संपादन]