पु. ल. देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
'पु. ल. देशपांडे'
पु.ल.देशपांडे.jpg
पु. ल. देशपांडे
पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
टोपणनाव पु.ल.
जन्म नोव्हेंबर ८, इ.स. १९१९
मुंबई
मृत्यू जून १२, इ.स. २०००
पुणे
कार्यक्षेत्र नाटक, साहित्य, संगीत,
विनोद, तत्वज्ञान, दूरचित्रवाणी
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
पुरस्कार पद्मश्री सन्मान
महाराष्ट्र भूषण
साहित्य अकादमी
महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
वडील लक्ष्मण देशपांडे
पत्नी सुनीता देशपांडे

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थात पु. ल. देशपांडे (नोव्हेंबर ८, इ.स. १९१९ - जून १२, इ.स. २०००) हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीतदिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके बहुरूपी व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात.
'गुळाचा गणपती' या 'सबकुछ पु. ल.' म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते.

अनुक्रमणिका

[संपादन] जीवन

मुंबईत जन्मलेले पु ल, पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी महाविद्यालयात शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. ते १९४६ साली सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले.

मराठी साहित्य व संगीतातील उत्तुंग योगदानाव्यतिरिक्त पु. लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.

पु. लं.चे १२ जून, इ.स. २००० रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी पुण्यात निधन झाले.

[संपादन] उल्लेखनीय

[संपादन] कार्य

[संपादन] चित्रपट

वर्ष चित्रपट भाषा सहभाग
१९४७ कुबेर मराठी अभिनय
१९४८ भाग्यरेषा मराठी अभिनय
१९४८ वंदेमातरम् मराठी अभिनय
१९४९ जागा भाड्याने देणे आहे मराठी पटकथा, संवाद
१९४९ मानाचे पान मराठी कथा-पटकथा-संवाद (ग.दि.माडगूळकरांच्या सह); संगीत
१९४९ मोठी माणसे मराठी संगीत
१९५० गोकुळचा राजा मराठी कथा, पटकथा, संवाद
१९५० जरा जपून मराठी पटकथा, संवाद
१९५० जोहार मायबाप मराठी अभिनय
१९५० नवरा बायको मराठी कथा, पटकथा, संवाद, संगीत
१९५० पुढचे पाऊल मराठी पटकथा, संवाद(ग.दि.माडगूळकरांच्या सह); अभिनय
१९५० वर पाहिजे मराठी कथा (अच्युत रानडे यांच्या सह); संवाद
१९५० देव पावला मराठी संगीत
१९५२ दूध भात मराठी कथा, पटकथा, संवाद, गीतरचना, संगीत
१९५२ घरधनी मराठी पटकथा, संवाद, गीतरचना, संगीत
१९५२ संदेश हिंदी कथा, पटकथा, संवाद (संवादाचे हिंदी भाषांतर: मीर असगर अली)
१९५३ देवबाप्पा मराठी पटकथा, संवाद, संगीत, गीतरचना(ग.दि.माडगूळकरांच्या सह)
१९५३ नवे बिर्‍हाड मराठी संवाद, संगीत
१९५३ गुळाचा गणपती मराठी कथा, पटकथा, संवाद, संगीत, अभिनय, दिग्दर्शन
१९५३ महात्मा मराठी, हिंदी, इंग्रजी कथा
१९५३ अंमलदार मराठी पटकथा, संवाद, संगीत, अभिनय
१९५३ माईसाहेब मराठी पटकथा, संवाद
१९६० फूल और कलियाँ हिंदी कथा, पटकथा
१९६३ आज और कल हिंदी कथा, पटकथा

[संपादन] लेख/कथा/कादंबरी


[संपादन] विनोद

[संपादन] प्रवासवर्णन

[संपादन] व्यक्तिचित्रे

[संपादन] कादंबरी (अनुवाद)

[संपादन] चरित्र

गांधीजी (२ ऑक्टोबर १९७०)

[संपादन] संकीर्ण

दाद

रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग १

रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग २

[संपादन] रंगमंच

[संपादन] एकपात्री प्रयोग

[संपादन] नाटक

[संपादन] एकांकिका-संग्रह

[संपादन] लोकनाट्य

[संपादन] काही विनोदी कथा

[संपादन] संदर्भ

[संपादन] बाह्य दुवे

विकिक्वोट
पु. ल. देशपांडे हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये