पुरुषोत्तम करंडक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुणे शहरातील महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्था कॉलेजांतील विद्यार्थ्यांनी रंगमंचावर सादर केलेल्या मराठी एकांकिकांची स्पर्धा घेते. स्पर्धेतील यशस्वी एकांकिकेला करंडक दिला जातो. ही प्रथा इ.स.१९६३पासून सुरू आहे. महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र उर्फ अप्पासाहेब वझे यांचे दिनांक १ ऑगस्ट १९६२ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ या करंडकाला पुरुषोत्तम करंडक असे नाव देण्यात आले.

२०१० सालापासून संस्थेने स्पर्धेची व्याप्ती वाढवण्यास सुरुवात केली. आता कोल्हापूर, जळगाव व रत्‍नागिरी या शहरांतही पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येतात. २०१२ सालापासून मुंबईतही मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने या स्पर्धा होत आहेत.

पुरुषोत्तम स्पर्धेत सादर झालेल्या काही बक्षीसपात्र एकांकिका- कंसात वर्ष किंवा/आणि सादरकर्त्या कॉलेजचे/संस्थेचे नाव[संपादन]

  • अठराव्वा उंट - (सादरकर्ते-संक्रमण पुणे- उत्तेजनार्थ पारितोषिक २०१३)
  • ग्लोबल आडगाव - (देवोगिरी महाविद्यालय,औरंगाबाद २०१४)
  • आम्ही तिघे (२०१३)
  • आय ड्रेम्ट अ पाय (कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय)
  • उळ्ळागड्डी - (सादरकर्ते- भारती विद्यापीठ फाईन आर्ट -२०१३)
  • एका रात्रीची बाई (सादरकर्ते- सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय- २०१३)
  • एन्ड्रील (२००७)
  • कडमिंचे (MIT - २०१४)
  • कला काना का (MIT - २०१३)
  • खौफ (सादरकर्ते- सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय; २०१४- सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी देण्यात येणारा जयराम हर्डीकर करंडक)
  • गुलमकाई (सादरकर्ते- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय)
  • घड्याळ (सादरकर्ते-VIT)
  • चंद्र सावली कोरतो (१९९४)
  • चॉकलेटचा बंगला - (सादरकर्ते- गरवारे वाणिज्य महाविद्यालय -२०१३)
  • चिठ्ठी (सादरकर्ते- पुण्याचे विधी महाविद्यालय; २०१४-सर्वाधिक पारितोषिके)
  • झुलता पूल
  • संगीत ढोल (सादरकर्ते-श्री बालाजी ऑन क्रियेशन- उत्तेजनार्थ पारितोषिक २०१३)
  • ३० फेब्रुवारी १९८८ (१९८७)
  • संगीत देणं (सादरकर्ते- सृजन पुणे- २०१३)
  • दोज फ्यू पेजेस (२०१३)
  • दोन शूर (२००८)
  • नाईट ऑफ शर्वर सा (पुणे शिक्षण मंडळ इंजिनियरिंग-२०१२)
  • इंदी : (सादरकर्ते - गरवारे महाविद्यालय -२०१३)
  • संगीत पाझर - सादरकर्ते- अनुभव पुणे -२०१३)
  • पेष्टी (२०१३)
  • फ्लॅशमॉब (सादरकर्ते- मॉडर्न कॉलेज- २०१३)
  • बेल (सादरकर्ते- स.प. महाविद्यालय- २०१३)
  • मॅन ऑफ द मॅच (पुणे विद्यार्थिगृह इंजिनियरिंग-२०१२)
  • मळभ (सादरकर्ते- MIT-COE; २०१४-संजीव करंडक)
  • यातनाघर (१९७५)
  • रूह हमारी (गरवारे वाणिज्य महाविद्यालय)
  • वास इज दास (सिंबायोसिस आर्ट्‌स ॲन्ड सायन्स - २०१२),
  • विष्णूगुप्त (२०१३)
  • सज्जाद (सादरकर्ते- B.S.C.O.E.)
  • सांबरी (सादरकर्ते- फर्ग्युसन कॉलेज- २०१३)
  • सालं एकदा तरी (सादरकर्ते- डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज- २०१३).
  • सीन ऑफ सिन (अभिनव कला महाविद्यालय)
  • संगीत स्मृतिचिन्ह (सादरकर्ते- नाट्यमंडळ, पुणे- २०१३)

संकलन[संपादन]

उत्तमोत्तम एकांकिका-पुरुषोत्तमच्या, खंड १ आणि २ (पुरुषोत्तम करंडकाच्या स्पर्धेदरम्यान सादर झालेल्या उत्तमोत्तम एकांकिकांचे ज्योती कुलकर्णी यांनी केलेले संकलन) हे पुस्तक मिलिंद सबनीस यांनी संपादित केले असून ’महाराष्ट्र कलोपासक या संस्थेने प्रकाशित केले आहे.)

हेसुद्धा पहा[संपादन]

एकांकिका, नाटक