पी.जी. वुडहाउस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर पेल्हॅम ग्रीनव्हील वुडहाउस उर्फ प्लम म्हणजेच पी. जी. वुडहाउस (१५ ऑक्टोबर १८८१, १४ फेब्रुवारी १९७५) हे निखळ विनोदातून वास्त्वाचे दर्शन घडविणारे, माणसाच्या गुण्दोषांवर सहजपणे लक्ष वेधून घेणारे लेखक होते. तालेवार घराण्यातील बर्टीवुस्टर आणि त्याचा हरकाम्या नोकर जीव्हज या त्यांच्या व्यक्तिरेखांनी वुडहाउस यांना अफाट प्रसिद्धी मिळवून दिली.

वुडहाउस यांचे वडील हेनरी वुडहाउस हे हाँग काँग येथे न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. वुडहाउस घराणे हे जुने, सुसंस्कृत घराणे समजले जाई.

त्या काळातील इंग्लंड मधील श्रीमंत घराण्यातील वातावरण, त्या लोकांच्या भावना, प्रतिस्पर्धी लोकांवर मात / कुरघोडी करण्याचे प्रयत्न त्यांच्या चित्रविचित्र फॅशन्स, उद्दामपणा, खोट्या कल्पनांना कुरवाळून जगणे, त्या कल्पना साकारण्यासाठी केलेली धडपड - या आणि अशा विषयांवर वुडहाउस यांनी आपल्या लिखाणातून जबरदस्त प्रहार केले. पण वुडहाउस यांनी कधीही कोणावरही व्यक्तीगत चिखलफेक केली नाही. त्यांच्या गोष्टीतील घटना आणि व्यक्ती, त्यांची फजिती, तारांबळ या मुळेच विनोद घडतो.

वैयक्‍तिक साधने