पित्ताशय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पचनसंस्थेतील अन्य अवयवांसह पित्ताशयाचे स्थान दर्शवणारे चित्र (मजकूर: इंग्लिश)

पित्ताशय (इंग्लिश: Gallbladder (गॉलब्लॅडर), cholecyst (कोलिसिस्ट) ;) हा पृष्ठवंशी प्राण्यांच्या उदरपोकळीतला, अन्नाच्या पचनास मदत करणारा महत्त्वाचा अवयव आहे. यकृताने निर्मिलेले पित्तरस यात साठवले जाते.

अनुक्रमणिका

[संपादन] आकार

याचा आकार नासपतीच्या फळासारखा असतो. हे यकृतास व खालच्या बाजूस लहान आतड्याला जोडलेले असते.

[संपादन] कार्ये

यकृतातील पित्तरसाचे पाण्याचा अंश कमी करून स्निग्धांशाच्या पचना योग्य बनवने व खालच्या बाजूस लहान आतड्याला गरजेनुसार पुरवणे.

[संपादन] पित्ताशयाचे आजार

पित्ताशयातील बिलिरुबिन व कॅल्शियमयुक्त खडे
पित्ताशयातील कॉलेस्टेरॉलयुक्त खडे
  • पित्ताशयातील खडे- पित्ताशयाच्या पिशवीसारख्या भागात पित्तरसातील पाणी कमी केले जाते, त्यावेळी काही रसायनांचे खडे तयार होतात. हे कॉलेस्टेरॉल किंवा बिलिरुबिन व कॅल्शियमचे खडे तयार होतात.
  • पित्ताशयाला सुज- पित्ताशयाला जंतुसंसर्गामुळे सुज येते.
  • पित्ताशयातील पॉलीप

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये