पिंगळा
| शास्त्रीय नाव | Athene brama brama (Temminck) |
|---|---|
| कुळ | घूकाद्य (Strigidae) |
| अन्य भाषांतील नावे | |
| इंग्लिश | Spotted Owlet |
| संस्कृत | पिंगला, कृकालिका |
| हिंदी | खकूसट, खूसटिया |
भारतीय घुबड जातीच्या पक्ष्यांपैकी आकाराने सगळ्यात लहान पिंगळा हा पक्षी आहे. तो मानवी वसाहतीजवळ राहणे पसंत करीत असल्याने सर्वत्र परिचित आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] वर्णन
पिंगळा पक्षी आकाराने साधारणपणे मैना पक्ष्याएवढा (२१ सें. मी.) असतो. याचा मुख्य रंग करडा-तपकिरी असून त्यावर पांढरे ठिपके असतात. या ठिपक्यांवरूनच याला ठिपकेवाले घुबड असेही म्हणतात. याचे डोके गोल-वाटोळे असते आणि मानेवर तुटक पांढर्या रेषा असतात. याची चोच बाकदार, शिकार पकडण्यासाठी आणि मांस फाडण्यासाठी उपयुक्त तर डोळे पिवळे असतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात.
सर्व घुबडांप्रमाणेच पिंगळा सुद्धा आपली मान दोन्ही बाजुंनी १८० अंश फिरवु शकतो, यामुळे एकाच जागी बसला असतांनाही तो क्षणात त्याच्या मागे काय घडत आहे ते पाहू शकतो. अंधारात राहण्यासाठी कान आणि डोळे अनुकुल झाले असल्याने लहानात लहान आवाजाच्या दिशेनेही पिंगळा पक्षी रोखून पाहतो.
[संपादन] वास्तव्य
पिंगळा पक्षी भारतभर सर्वत्र तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार या देशात आढळतो. याच्या रंग आणि आकारावरून किमान तीन उपजाती आहेत. पिंगळा निशाचर पक्षी आहे. दिवसा जुन्या आमरायांमध्ये, झाडांच्या ढोलीत तसेच संधी असल्यास जुन्या मोठाल्या घरातील छताच्या आश्रयाने राहणे पसंत करतो. घनदाट वृक्षांच्या परिसरात पिंगळा कमी आढळतो.
[संपादन] खाद्य
पिंगळा निशाचर पक्षी आहे; तो रात्रीच्या वेळी बेडुक, लहान पक्षी, पाली, उंदीर, लहान पिले यांची शिकार करतो.
[संपादन] प्रजनन
साधारणपणे नोव्हेंबर ते मार्च-एप्रिल हा काळ पिंगळा पक्ष्यांचा वीणीचा काळ असून त्यांचे घरटे झाडाच्या ढोलीत, जुन्या इमारतीच्या छिद्रात, कडे-कपार्यात, छताजवळ मिळेल त्या साधनांनी बनविलेले किंवा दुसर्या पक्ष्यांनी सोडून दिलेल्या तयार घरट्यात असते. मादी एकावेळी ३ ते ४ पांढुरक्या रंगाची अंडी देते. अंडी उबविण्यापासून पिलांच्या संगोपनापर्यंत सर्व कामे नर-मादी मिळून करतात.
[संपादन] चित्रदालन
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |