पावशा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
चित्रदालन [संपादन]
पावशा (इंग्रजी: Brainfever Bird or Common Hawk-Cuckoo), (शास्त्रीय नाव: Cuculus varius varius), आकाराने साधारण कबुतराएवढा असलेल्या पावशाचे नाते पावसाळ्याशी जोडले आहे. मान्सूनचा पाऊस येण्या आधी याच्या 'पाऊस आला', 'पाऊस आला' (किंवा 'पेरते व्हा', 'पेरते व्हा') अशा आवाजाने पावसाच्या आगमनाची सूचना मिळते असे बळीराजा मानतो, शेतीच्या कामाला लागतो. हा पक्षी सामान्यांच्या जवळचा आहे. यावर अनेक भाषांमध्ये लोक-कथा, गीते, म्हणी वगैरे आहेत.
नर-मादी दिसायला सारखेच, राखेच्या रंगाचे, शेपटीवर पट्टे असतात. भारतात सर्वत्र आढळतो, झुडपी जंगल आणि शेताच्या जवळपास राहणे पसंत करतो. विणीचा काळ मार्च ते जून असून कोणत्याही 'ककु' सारखे मादी स्वतःचे अंडे दुसऱ्या पक्षांच्या घरट्यात गुपचूप टाकून निघून जाते. पुढे यांच्या पिलांना वाढवायची जबाबदारी अशा पालकांची असते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |