पांडुरंग महादेव बापट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पांडुरंग महादेव बापट
Senapati Bapat1.GIF
सेनापती बापट स्मरणार्थ काढलेले टपाल तिकीट
टोपणनाव: सेनापती बापट
जन्म: नोव्हेंबर १२, इ.स. १८८०
मृत्यू: नोव्हेंबर २८, इ.स. १९६७
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
धर्म: हिंदू
वडील: महादेव
आई: गंगाबाई

पांडुरंग महादेव बापट ऊर्फ सेनापती बापट (नोव्हेंबर १२, इ.स. १८८० - नोव्हेंबर २८, इ.स. १९६७) हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक होते.

जन्म व शिक्षण[संपादन]

त्यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक आणि बी. ए. पर्यतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. बी.ए. परीक्षेत इ.स. १९०३ साली उत्तीर्ण झाल्यावर मुबंई विद्यापिठाची शिष्यतृत्ती मिळवुन त इंग्लंडला गेले एडिंबरो येथे इंजिनिअरिंग कॉलेज घेतला.त्यांचे मुळ गाव हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर हे आहे. पारनेर तालुक्यातील गणेशखिंड येथील गणपती मंदिरात ते राहत असत . या मंदिरापासून तर सेनापती बापटांचे पारनेर शहरातील मूळ घर यांदरम्यान मोठा भुयारी मार्ग आहे या मार्गाची सध्या पडझड झाली आहे त्यांचे पारनेर मधील घर सेनापती बापट स्मारक म्हणून ओळखले जाते

कार्य[संपादन]

सेनापती बापटांनी लंडन येथील वास्तव्यामध्ये बाँब बनवण्याची कला हस्तगत केली. असे असले तरी हि "माझ्या बाँबमुळे एकही बळी गेला नाही". ते फक्त आमच्या कार्याकडे ल़क्ष वेधण्यास केले गेले होते" असे त्याचे म्हणणे होते. मात्र तरीही त्याना अलिपुर बाँब खटल्यात सहभागी असल्याचा त्यांच्याव‍र आरोप होता. इ.स. १९२१ पर्यत स्वत:च्या जन्मगावी शिक्षक म्हणून राहिले आणि समाजसेवा व्रत घेतले. पहाटे उठल्याबरोबर गावचे रस्ते झाडणे व शौचकूप साफ करणे हे व्रत त्यांनी जन्मभर स्वीकारले.

इ.स. १९२१ ते इ.स. १९२४ या कालखंडात पुणे जिल्हयातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकर्‍यांना जमीन मिळविण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालवले या आंदोलनात कारागृहावासाची तीनदा शिक्षा त्यांना झाली. शेवटची सात वर्षे सक्तमजुरीची होती. संस्थाची प्रजांच्या हक्कांकरिता चालु असलेल्या आंदोलनात भाग घेऊन संस्थानच्या प्रवेशबंद्या त्यांनी मोडल्या त्याबदल कारागृहवासही सोसला. स्वातंत्र्योत्तरकाळातही भाववाढ विरोधी आंदोलन गोवामुक्ती आंदोलन संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इ. आंदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.

गौरव[संपादन]

पुण्यातील १५ ऑगस्ट, इ.स. १९४७ साली ध्वजारोहण सेनापती बापटांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यातील सार्वजनिक रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

संदर्भ[संपादन]