पदावली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बीजगणितानुसार पदावली (मराठी लेखनभेद: पदावलि ; इंग्लिश: Expression, एक्सप्रेशन ;) म्हणजे गणिती चिन्हांची व बैजिक चिन्हांची सांत रचना असते. पदावल्यांच्या घटकांमध्ये स्थिरांक व चलांक इत्यादी गणिती चिन्हे/राशी, तसेच क्रिया व संबंध दर्शवणारी बैजिक चिन्हे मोडतात. पदावल्या अंकगणितातील एखाद्या सोप्या क्रियांपासून बनलेल्या असू शकतात, उदा.:

3+5\times\left((-2)^7-\frac32\right)

, किंवा चलांक, फल, क्रमचय, योगफल, विकलकसंकलक यांपासून बनलेल्या जटिल मांडण्या असू शकतात. उदा.:

f(a)+\sum_{k=1}^n\left.\frac{1}{k!}\frac{d^k}{dt^k}\right|_{t=0}f(u(t))\ +\ \int_0^1 \frac{(1-t)^n }{n!} \frac{d^{n+1}}{dt^{n+1}} f(u(t))\, dt.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये