नीलपरी (पक्षी)
नीलपरी अथवा ललिता (शास्त्रीय नाव : Irena puella ; इंग्लिश: Asian Fairy-bluebird) हा उष्ण कटिबंधीय आशियात, विशेषकरून हिमालयाच्या पायथ्याकडील भागापासून दक्षिण आशिया व आग्नेय आशिया या भूप्रदेशांत आढळणारा मध्यम आकारमानाचा पक्षी आहे. हा पक्षी साधारण २७ सें. मी. आकाराचा असून नर गडद निळ्या आणि काळ्या रंगाचा तर मादी फिकट निळ्या-हिरव्या रंगाची असते. दक्षिण आशियात याचा आढळ सह्याद्री पर्वतरांगाजवळच्या प्रदेशात, रत्नागिरी ते केरळ तसेच पूर्व हिमालय आणि अंदमान आणि निकोबार येथील सदाहरित आणि मध्यम सदाहरित जंगालात तसेच कॉफीच्या मळ्यांजवळच्या परिसरात दिसतो. नीलपरी हा मुख्यत्वे झाडावर राहणारा पक्षी असून लहान थव्यांमध्ये तसेच हरियाल, धनेश सारख्या फळे खाणाऱ्या पक्ष्यांसोबत राहतो.
याचा वीण काळ फेब्रुवारी ते एप्रिल असून यात स्थानिक बदल होतात. नीलपरीचे घरटे उंच वाढणाऱ्या झाडांवर, आडव्या पसरलेल्या काटक्यांवर शेवाळे वगैरे पसरून तयार केलेले असते. हे घरटे झाडात लपलेले असते. मादी एकावेळी गडद हिरव्या रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली २ ते ३ अंडी देते.
[संपादन] चित्रदालन
[संपादन] बाह्य दुवे
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |