नासी लमाक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नासी लमाक (मराठी लेखनभेद: नासी लेमाक ; भासा मलायू, भासा इंडोनेशिया: Nasi lemak ;) ही मलेशिया, ब्रुनेई, सिंगापूर, दक्षिण थायलंड व इंडोनेशियाच्या रियाउ बेटांवर प्रचलित असणारी थाळी आहे. मलय भाषेतील नासी म्हणजे भात आणि लमाक म्हणजे मलई /(बहुतकरून) नारळाचे दूध एतदर्थाच्या शब्दांपासून बनलेल्या या नावाचा अर्थ नारळाचे दूध घालून शिजवलेला भात, असा होतो. परंतु सहसा नासी लमाक या नावाने मिळणाऱ्या थाळीत भातासोबत इकान बिलिस - अर्थात माशांचे सुकट, भाजलेले शेंगदाणे, उकडलेले अंडे व सांबाल नावाची तिखट-मसालेदार चवीची चटणी हे पदार्थ हमखास आढळतात. बऱ्याच वेळा थाळीतल्या या नेहमीच्या घटकांसोबत चिकन, रंदांग गोमांस, खुबे (कालवांचा प्रकार), कांकोंग पालेभाजी यांपैकी एखादा पदार्थदेखील समाविष्ट असू शकतो.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- रासा मलेशिया - नासी लमाकाविषयी माहिती व पाककृती (इंग्लिश मजकूर)