नारायण दत्त तिवारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नारायण दत्त तिवारी
जन्म ऑक्टोबर १५,इ.स. १९२५
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय

नारायण दत्त तिवारी (ऑक्टोबर १८,१९२५ - ऑक्टोबर १८,२०१८ ) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेश राज्याचे इ.स. २००७ पासून राज्यपाल होते. ते मार्च इ.स. २००२ ते मार्च इ.स. २००७ या काळात उत्तरांचलचे आणि जानेवारी इ.स. १९७६ ते एप्रिल इ.स. १९७७, ऑगस्ट इ.स. १९८४ ते सप्टेबर इ.स. १९८५ आणि जून इ.स. १९८८ ते डिसेंबर इ.स. १९८८ दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. अशाप्रकारे दोन राज्यांचे मुख्यमंत्रापद भुषविण्याचा मान त्यांना मिळाला.

ते इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेवर निवडून गेले.त्याचबरोबर जून इ.स. १९८० ते जुलै इ.स. १९८१ या काळात ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते.त्यानंतर ऑक्टोबर इ.स. १९८० ते फेब्रुवारी इ.स. १९८३ या काळात त्यांनी केंद्र सरकारमध्ये कामगारमंत्री, उद्योगमंत्री,अवजड उद्योगमंत्री आणि कायदामंत्री ही पदे भूषविली. तसेच जून इ.स. १९८५ ते ऑक्टोबर इ.स. १९८६ या काळात ते पेट्रोलियम मंत्री,ऑक्टोबर इ.स. १९८६ ते जुलै इ.स. १९८७ या काळात ते परराष्ट्रमंत्री आणि जुलै इ.स. १९८७ ते जून इ.स. १९८८ या काळात ते अर्थमंत्री होते.

मागील
हेमवती नंदन बहुगुणा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री
जून २१, इ.स. १९७६ - एप्रिल ३०,इ.स. १९७७
पुढील
रामनरेश यादव
मागील
श्रीपती मिश्रा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री
ऑगस्ट ३, इ.स. १९८४ - सप्टेंबर २४, इ.स. १९८५
पुढील
वीर बहादुर सिंग
मागील
वीर बहादुर सिंग
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री
जून २५, इ.स. १९८८ - डिसेंबर ५, इ.स. १९८९
पुढील
मुलायम सिंग यादव
मागील
भगतसिंग कोशियारी
उत्तराखंडचे मुख्यमंत्री
मार्च २, इ.स. २००२ - मार्च ८, इ.स. २००७
पुढील
भुवनचंद्र खंडुरी
मागील
रामेश्वर ठाकूर
आंध्र प्रदेशचे राज्यपाल
ऑगस्ट २२, इ.स. २००७ - ]
पुढील
सध्यापर्यंत