नागचाफा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा आश्लेषा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. याला इंग्रजीमध्ये मेस्युआ पेरिआ(Mesua ferrea) आहे. हे त्रिपुरा राज्याचे राज्यकीय पुष्प आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] वनस्पती
- "नागचंपा', "नागकेशर' या प्रचलित नावांनी हा वृक्ष ओळखला जातो.
- हा वृक्ष उंच वाढणारा, सदाहरित असून, याची साल राखाडी, गुळगुळीत असते.
- पाने वैविध्यपूर्ण असतात.
- फुलांमध्ये मोठ्या चार पाकळ्या, गुच्छात पिवळ्या रंगाचे पुंकेसर असतात. या वृक्षास फुले उन्हाळ्यात येतात.
[संपादन] लागवड
- बियाणे परिपक्व झाल्यानंतर ते लगेच पिशवीत टाकून रोपे करावीत.
[संपादन] उपयोग
- बिया श्वसनाच्या विकारावरील औषधांत वापरतात.
- पुंकेसराना नागकेशर म्हणतात.
- पुंकेसर रक्ती मूळव्याध, आव, अतिसार वगैरे विकारात होणारा अतिरक्तस्त्राव थांबवण्यासाठी रक्तस्तंभक म्हणून वापरतात.
- लाकूड अत्यंत टणक असते, म्हणून त्याला सिलोन आयर्न वुड ट्री, असे ही नाव आहे.
[संपादन] वावर
- मूळ स्थान म्यानमार, मलेशिया, श्रीलंका आणि भारत हे देश आहेत.