अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नवोदित मराठी साहित्य संमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)

अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाते. या परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमुख संयोजक शरद गोरे,व राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर, राष्ट्रीय विश्वस्त दशरथ यादव आहेत.हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित केले जाते.

अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन हे नवोदित मराठी लेखकांचे संमेलन असते. आत्तापर्यंत या नावाने एकवीस साहित्य संमेलने झाली आहेत. २१वे संमेलन लातूरला झाले. त्यानंतरचे २२वे संमेलन २३ आणि २४ मे २०१५ रोजी रोजी तुळजापूरला झाले. संमेलनाध्यक्ष भालचंद्र नेमाडे (?) होते. २४वे नवोदितांचे साहित्य संमेलन वणी येथे २१-२२ मे २०१७ रोजी होणार आहे. संमेलनाध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर असतील.

हे आणि या पूर्वीची नवोदित मराठी साहित्य संमेलने[संपादन]

  • २१वे : लातूरला, २५,२६, २७ जुलै, २०१४; संमेलनाध्यक्ष प्रा. भास्कर चंदनशिव
  • २०वे : उस्मानाबादला, २१, २२ मे २०१३; संमेलनाध्यक्ष राजन खान; उद्‌घाटक रा.रं. बोराडे
  • १९वे : सोलापूरला, १८ ते २० मे २०१२; संमेलनाध्यक्ष : लक्ष्मण माने; स्वागताध्यक्ष शिवाजी सावंत
  • १८वे : बारामतीला,१९ ते २१ ऑगस्ट, २०११; संमेलनाध्यक्ष : डॉ.आ.ह. साळुंखे
  • १७वे : रत्‍नागिरीला, १५ ते १६ मे, २०१०; संमेलनाध्यक्ष : प्रा. रामनाथ चव्हाण
  • १६वे : संगमनेरला, २८ मे २००९; संमेलनाध्यक्ष : डॉ. नरेंद्र जाधव
  • १५वे : औरंगाबादला, २४ ते २५ मे, २००८; संमेलनाध्यक्ष : डॉ. विठ्ठल वाघ
  • १०वे : पुण्याला, १९ ते २० मे , २००३; संमेलनाध्यक्ष : गंगाधर पानतावणे

अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे यापूर्वी होऊन गेलेले अन्य संमेलनाध्यक्ष :

शिवाजी सावंत, नारायण सुर्वे, विश्वास पाटील, मंगेश पाडगावकर, इंद्रजित भालेराव, रा.रं. बोराडे, डॉ.जनार्दन वाघमारे, डॉ.हंसराज वैद्य, रतनलाल सोनाग्रा, वगैरे.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद[संपादन]

महाराष्ट्र, गोवा, छ्त्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ही परिषद काम करते. 'नवोदित साहित्य संमेलनाशिवाय राज्यात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशी बारा साहित्य संमेलने होतात. इ.स.२०१२ पर्यंत झालेली अशी संमेलने :

  • महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन : गेली पाचहून अधिक वर्षे, खानवडी ‍तालुका पुरंदर(जिल्हा पुणे)
  • छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन, सासवड येथे गेली चारहून अधिक वर्षे.
  • ग्रामीण मराठी साहित्य संमेलन नगर, वैजापूर
  • राज्यस्तरीय लोकनेते शरदराव-जी पवार कृषी साहित्य संमेलन, २०१२ पहिले संमेलन बारामती येथे अध्यक्ष - दशरथ यादव
  • जिल्हास्तरीय संमेलन नाशिक, सातारा, उस्मानाबाद, श्रीगोंदा, श्रीरामपूर,
  • विभागीय साहित्य संमेलन, वणी (विदर्भ)
  • परिवर्तन साहित्य संमेलन, पलूस (२००५). अध्यक्ष किरण शिंदे.
  • राज्यस्तरीय पहिले मराठी साहित्य संमेलन, कळंब, २०१२; - अध्यक्ष : ?

पहा :मराठी साहित्य संमेलने