सहाय्य:संपादन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(नवीन लेख कसा लिहावा या पानावरून पुनर्निर्देशित)
विकिपीडियामध्ये लेखांची भर घालण्यापूर्वी लेखकाने आपले विकिपीडिया खाते उघडलेले असणे सर्वांनाच सोयीचे आहे. विकिपीडियात संपादन कसे करावे याची प्राथमिक माहिती खाली दिली आहे. इतर साहाय्या करिता Help:Contents इथे जा.

अनुक्रमणिका

[संपादन] शुद्धलेखन आणि व्याकरण

मराठी व्याकरण या लेखामध्ये मराठी व्याकरण आणि त्यासंबधीची माहिती आहे. मराठी शुद्धलेखन हा लेखदेखील उपयोगी ठरावा. Wikipedia:अशुद्धलेखन हा अशुद्धलेखनाचे शुद्धीकरण कसे करावे अथवा करवून घ्यावे या संबधीचा प्रकल्प आहे.

[संपादन] विकिपीडिया लेखनशैली

विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश असल्यामुळे सर्वसमावेशक पण तटस्थ दृष्टीकोणातून संदर्भासहीत लेखन हा विकिपीडियाचा गाभा आहे.कोणतेही विषय लिहिताना सर्वसाधारणपणे कसे हाताळावेत किंवा काय काळजी घ्यावी ह्याची माहिती विकिपीडिया:परिचय लेखात उपलब्ध आहे.

अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके वगैरे यांची स्वतःची एक लेखनशैली असते. काही वेळा ही लेखनशैली प्रत्यक्षरीत्या किंवा जाहीररीत्या चर्चिली जाते तर काही वेळा ती फक्त त्या माध्यमाशी निगडित व्यक्तींपर्यंतच मर्यादित राहते. विकीपीडिया लेखनशैली अद्याप निश्चित झालेली नाही. परंतु विकिपीडियासाठी काही नमुना मांडणीचे लेख लिहिलेले आहेत सोबतच विकिपीडिया मुखपृष्ठ सदरातील लेखांची मांडणीहसुद्धा मार्गदर्शक ठरू शकते. ह्या लेखांची मांडणी (लेख नव्हे) जरी अंतिम नसली तरी बर्‍याच आवर्तनांनंतर ती तशी बनलेली आहे. लेख लिहिताना इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द पारिभाषिक संज्ञा या लेखामध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यात अधिकाधिक सुधारणा होतच राहतील. लेखांबद्दल आपले मत आपण नोंदवू शकता.

[संपादन] विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत

लेखांची आणि पानांची नावे शक्यतो मराठी भाषेतच (देवनागरी लिपी) असावीत.अगोदर सहमती न केलेली देवनागरी लिपीत नसलेली शीर्षके वगळली(पुसली) जावीत.ज्यांना देवनागरी लिपीत वाचन कसे आणि लेखन कसे करावे याची माहिती नाही त्यांना मार्गदर्शन करणारी आवश्यक तेवढी सुयोग्य सहाय्य पाने इतर(इंग्रजी) भाषेत उपलब्ध ठेवली आहेत.इंग्रजी माध्यमातून शालेय िशक्षण घेतलेल्या मराठी लोकांनी त्यांच्या सहाय्यास्तव योग्य पाने तयार केली जातील परंतु येथे मराठी विकिपीडियावर देवनागरी लिपीच आग्रहाने वापरली जाईल.

आंतरविकि संपर्क करू इचीणार्^या अमराठी बांधवांकरिता आंतरविकि दूतावास व Bot पेज केवळ इतर भाषेच्या वापराकरिता मोकळे ठेवले आहे.चर्चा पानांवर इंग्रजी लेखनाची गरजे नुसार मुभा सर्वांनाच आहे तरीपण तेथे सुद्धा शक्यतो मराठीचा वापरकरणे अपेक्षीत आहे.

[संपादन] नमुना मांडणीचे लेख

विकिपीडियातील सर्वोत्तम लेख मुखपृष्ठावरील मासिक सदर विभागात प्रदर्शित केला जातात. त्या लेखांचा नीट अभ्यास करुन आपण विकिपीडियावर लेख कसे लिहावेत याचा अभ्यास करू शकता. विकिपीडियात संपादन करताना काही शंका आल्यास विकिपीडिया:चावडी येथे संपर्क साधणे. विकिपीडियावरील काही उत्तम लेख पुढील प्रमाणे-

संपादन कसे करावे याची अधिक माहिती मिळवण्यापूर्वी अजून वाचन करावयाचे असल्यास विकिपीडिया:सफर येथे जा.

[संपादन] विकिभाषेद्वारे संपादन

Button bold.png Button italic.png Button link.png Button extlink.png Button headline.png Button image.png Button media.png Button math.png Nowiki icon.png Button sig.png Button hr.png

हा विभाग विकिभाषेचा उपयोग करून विकिपीडियावर संपादने कशी पार पाडावीत याची माहिती देतो. या माहितीचे छ्पाईयोग्य संक्षीप्त टाचण येथे उपलब्ध आहे (ते प्रींट करून सोबत बाळगता येईल किंवा महाविद्यालयात नोटीस बोर्डावर किंवा महाविद्यालयाच्या वार्षीक अंकात अंतर्भूत करता येईल.)

मुख्य लेख सहाय्य:विकिभाषेद्वारे संपादन येथे पूर्ण करून हवा आहे त्यास हात भार लावा.

विकिला स्वतःची विशिष्ट लेखन शैली नसली तरी वाचक,लेखक व संपादकांच्या सोयीनुसार काही संकेत आणि विकिसंज्ञा हळू हळू रूढ होत आहेत; उदाहरणार्थ, शीर्षकलेखनाचे संकेत, शुद्धलेखन इत्यादी.

तसेच विकिमध्ये सर्वसामान्यपणे कुणालाही संपादन करता यावे म्हणून संगणकाच्या कळफलकावर सहज उपलब्ध असलेल्या चिन्हांची एक सोपी चिन्हांकित भाषाप्रणाली बनवलेली आहे तिला विकिभाषा किंवा विकि मार्कअप लँग्वेज असेही म्हणतात.

उदाहरणार्थ

तरंगचिन्ह ~ सामान्यपणे कळफलकावरील १ या आकड्याच्या डावीकडे असते. शिफ्टकळ आणि '~' चिन्हाची कळ दाबली असता उपलब्ध होते.

उपयोग- मुख्यत्वे सही करण्याकरता तरंग चिन्ह चारवेळा ~~~~ असे दाबून वापरले असता सदस्याची डिजिटल(डिजिटल शब्दाचा उपयोग येथे बरोबर आहे का नाही याची खात्री करा!) विकिसही आपोआप बनते.

आठ या अंकाच्या डोक्यावरील * हे तारकाचिन्ह आठ हा अंक आणि शिफ्ट कळ सोबत दाबले असता मिळणारे .त्या प्रमाणेच==== | {{}} [[]] : <> ''' ''' इत्यादी विकिभाषा चिन्हे विकि संपादताना विकिभाषेत कशी वापरली जातात ते आपण येथे पाहू.

[संपादन] शीर्षक

देवणी विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून • Interested in contributing to Wikipedia? • येथे जा: सुचालन, शोधयंत्र देवणी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. देवणी हे गाव तेथील 'देवणी' गायींसाठी प्रसिद्ध आहे.यासाठी 'डोंगरे' कुटुंबाजवळची एक गाय सन १९६० मध्ये भारतात विजेती ठरली होती.[ संदर्भ हवा ] Deoni is the place very famous for the cow breed called deoni cow. The the originator of this breed is from Dongre Family.One of the cow from Dongre family got all india champion in 1960's.

कृपया या लेखाचा/विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.

[संपादन] उदाहरण

विकिपीडियात कसे दिसते जेव्हा तुम्ही असे लिहिता

नवीन विभाग

उपविभाग

उप-उपविभाग

  • नेहमी दुसर्‍या शीर्षक-पातळीपासून सुरूवात करा (==); पहिल्या शीर्षक-पातळीला (=) वापरू नका.
  • पातळ्यांना वगळू नका (जसे दुसर्‍या पातळीनंतर थेट चवथी पातळी).
  • ज्या लेखांना चार आणि अधिक विभाग असतील, त्या लेखांसाठी आपोआपच अनुक्रमणिका बनविली जाते.
  • जर योग्य आणि शक्य असेल तर उपविभागांना त्यांच्या नैसर्गिक क्रमाने मांडा (जसे लोकसंख्येऐवजी नावानुसार देशांची यादी).
==नवीन विभाग==

===उपविभाग===

====उप-उपविभाग====

केवळ एका नव्या ओळीचा आखणीवर सहसा काही परिणाम होत नाही. त्यांचा उपयोग एखाद्या परिच्छेदामध्ये येणार्‍या वाक्यांना विलग करण्यासाठी केला जाऊ शकतो. काही संपादन-प्रणालींना हे दोन पाठ्यांमधील फरक शोधण्यात उपयोगाचे आहे (विशेषतः एका पाठ्याच्या दोन आवृत्तींमधील फरक पाहण्यासाठी).

परंतु एखाद्या रिकाम्या ओळीमुळे नवीन परिच्छेद सुरू होतो.

  • यादीमध्ये वापरल्यानंतर मात्र, नवीन ओळीचा परिणाम आखणीमध्ये बदल होतो.
केवळ एका नव्या ओळीचा
आखणीवर सहसा काही परिणाम होत नाही.
त्यांचा उपयोग एखाद्या परिच्छेदामध्ये येणार्‍या
वाक्यांना विलग करण्यासाठी केला जाऊ शकतो.
काही संपादन-प्रणालींना हे दोन पाठ्यांमधील फरक
शोधण्यात उपयोगाचे आहे
(विशेषतः एका पाठ्याच्या दोन आवृत्तींमधील फरक पाहण्यासाठी).

परंतु एखाद्या रिकाम्या ओळीमुळे
नवीन परिच्छेद सुरू होतो.

तुम्ही ओळींना तोडू शकता
अगदी परिच्छेद न बदलता.

  • ही तरतूद मोकळेपणाने वापरा.
  • दोन ओळींमध्ये निर्देशक-खुणांना (markup) पूर्ण करा. एखादा दुवा, तिरके शब्द किंवा ठळक शब्द एका ओळीवर सुरू करून दुसर्‍या ओळीवर पूर्ण करू नका.
तुम्ही ओळींना तोडू शकता<br>
अगदी परिच्छेद न बदलता.
  • विकिभाषेत यादी/सूची करणे अतिशय सोपे आहे.:
    • प्रत्येक ओळ एका तारकेने सुरू करा.
      • अधिकची प्रत्येक तारका नवीन पातळी सुरू होते.
        • यादीमध्ये आलेल्या एक नवीन ओळीनंतर

त्या यादीमधील एक नग पूर्ण होतो.

  • एक नवीन ओळ नवीन यादीला सुरूवात करते.
* विकिभाषेत यादी/सूची करणे अतिशय सोपे आहे.:
** प्रत्येक ओळ एका तारकेने सुरू करा.
*** अधिकची प्रत्येक तारका नवीन पातळी सुरू होते.
**** यादीमध्ये आलेल्या एक नवीन ओळीनंतर
त्या यादीमधील एक नग पूर्ण होतो.

* एक नवीन ओळ नवीन यादीला सुरूवात करते.
  1. क्रमांकित याद्यादेखील बनविल्या जाऊ शकतात
    1. पद्धतशीर आणि नेटकेपणाने
    2. सोप्यारीतीने
      1. आणि कमीतकमी प्रयत्‍नांमध्ये
# क्रमांकित याद्यादेखील बनविल्या जाऊ शकतात
## पद्धतशीर आणि नेटकेपणाने
## सोप्यारीतीने
### आणि कमीतकमी प्रयत्‍नांमध्ये
व्याख्या-यादी 
व्याख्यांची यादी
नग 
आणि त्याची व्याख्या
आणखी एक नग
त्याचीदेखील व्याख्या या पद्धतीने
  • अर्धविरामाने (;) सुरूवात करा. एका ओळीवर एक नग; अपूर्णविरामापूर्वी (:) एक रिक्तओळ, पण अपूर्णविरामापूर्वी सोडलेली एक रिकामी जागा व्याकरणाच्या प्रकियेला सुधारते.
; व्याख्या-यादी : व्याख्यांची यादी
; नग : आणि त्याची व्याख्या
; आणखी एक नग 
: त्याचीदेखील व्याख्या या पद्धतीने
  • मिश्र-याद्यादेखील बनविता येतात
    1. आणि त्यांना एकमेकांमध्ये गुंफता येते
      • जसे की...
        आणि व्याख्या-यादी देखील...
        हे सर्व
        अतिशय
        सोप्या पद्धतीने बनवा
* मिश्र-याद्यादेखील बनविता येतात
*# आणि त्यांना एकमेकांमध्ये गुंफता येते
*#* जसे की...
*#*; आणि व्याख्या-यादी देखील...
*#*: हे सर्व 
*#*; अतिशय
*#*: सोप्या पद्धतीने बनवा
*#*:* अ
*#*:* ब
*#*:* क
एक अपूर्णविराम (:) एका ओळीला किंवा परिच्छेदाला प्रमाणबद्ध करतो.

आणि एक नवीन ओळ नव्या परिच्छेदाला सुरूवात करते.

: एक अपूर्णविराम (:) एका ओळीला किंवा परिच्छेदाला प्रमाणबद्ध करतो.
आणि एक नवीन ओळ नव्या परिच्छेदाला सुरूवात करते.

When there is a need for separating a block of text

the blockquote command will indent both margins when needed instead of the left margin only as the colon does.

This is useful for (as the name says) inserting blocks of quoted (and cited) text.

<blockquote>
The '''blockquote''' command will indent 
both margins when needed instead of the 
left margin only as the colon does.  
</blockquote>

(See formula on right):

  • This is useful for:
    • pasting preformatted text;
    • algorithm descriptions;
    • program source code;
    • ASCII art;
    • chemical structures;
  • WARNING: If you make it wide, you force the whole page to be wide and hence less readable, especially for people who use lower resolutions. Never start ordinary lines with spaces.
 IF a line starts with a space THEN
 it will be formatted exactly
 as typed;
 in a fixed-width font;
 lines will not wrap;
 ENDIF
Centered text.
  • Please note the American spelling of "center."
<center>Centered text.</center>

आडवी दुभाजक रेषा:

ही रेषेवरची ओळ


आणि ही रेषेखालची

  • मुख्यत: खालील गोष्टींसाठी वापरतात
    • नि:संदिग्धीकरण - पण फक्त संपूर्णत: वेगळे असंबंधित अर्थ लिहिताना
    • चर्चा पानांवर दोन धाग्यांमध्ये
ही रेषेवरची ओळ
----
आणि ही रेषेखालची

[संपादन] सारणी

विकीभाषेत सारणी बनविणे सोपे आहे. काही उदाहरणे खाली दिलेली आहेत आणि ही उदाहरणे केवळ प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. यापेक्षा कितीतरी मोठ्या, वेगळ्या आणि चांगल्याप्रकारे सारणी वापरल्या जाऊ शकतात.

[संपादन] सोपे उदाहरण

{| 
|पहिले घर, पहिली रांग
|दुसरे घर, पहिली रांग
|- 
|पहिले घर, दुसरी रांग
|दुसरे घर, दुसरी रांग 
|}

and

{| 
|पहिले घर, पहिली रांग || दुसरे घर, पहिली रांग
|- 
|पहिले घर, दुसरी रांग || दुसरे घर, दुसरी रांग 
|}

ही दोन्ही विकीभाषेतील उदाहरणे खालील मजकूर दाखवितात -

पहिले घर, पहिली रांग दुसरे घर, पहिली रांग
पहिले घर दुसरी रांग दुसरे घर दुसरी रांग


सध्या अतिशय गरजेची गोष्ट म्हणजे चित्रे होत. चित्रांची कमतरता जाणवत आहे. चित्रे संकेतस्थळावर चढविताना ते विकिकॉमन्स या संकेतस्थळावर (किंवा मराठी विकिपीडियावर) चढवावे. मराठी विकिपीडियाचा चेहरा आणि एकंदरीत बाज मराठमोळा बनविण्यासाठी मराठी संस्कृतीशी संलग्न चित्रे हवी आहेत. ती चित्रे फक्त सर्वसामान्यांसाठी खुली किंवा सार्वजनिक स्वरूपात असावीत (खाजगी असल्यास मूळ मालकाच्या परवानगीने आपण ती चित्रे उपलब्ध करू शकता).

[संपादन] नवा लेख कसा सुरू करावा

मराठी विकिवर सुरुवात करण्याच्या दोन पद्धती आहेत.

१. संदर्भित पानावरून दुवा तयार करून. एखाद्या पानावरील एखाद्या शब्दाबद्दल लेख लिहायचा असल्यास --

जर संदर्भित पानावर तो शब्द लाल रंगात व अधोरेखित (underlined) असेल, तर त्या शब्दावर टिचकी देताच लेख संपादित करावयाचे पान येईल. येथे लेख लिहून झाल्यावर save करावा. जर लाल रंगात नसेल, तर संदर्भित लेख संपादन करून त्या पानावरील इच्छित शब्द दुहेरी चौकटी कंसात ([[]]) लिहिल्यास असा दुवा तयार होईल. त्यावर टिचकी देता 'असा' हा लेख संपादित करायचे पान येईल. येथे लेख लिहून झाल्यावर save करावा. झाले नवीन पान तयार!

२. शोध करून. ज्या शब्दावर लेख लिहायचा आहे तो 'शोध' केल्यास तत्संबंधित लेखांचे मथळे येतील. त्याबरोबर 'No page with this exact title exists, trying full text search.' असेही एक वाक्य येईल (अर्थात, जर एखादा लेख आधीच लिहिला गेला असेल तर तोच येईल व हे वाक्य येणार नाही.) त्यातील this exact title वर टिचकी देताच इच्छित शब्दावरील लेख लिहीता येईल.

या माहितीचा उपयोग होऊन तुमच्याकडूनही मराठी विकिमध्ये मोलाची भर पडेल अशी आशा आहे.

जर अजून काही प्रश्न असल्यास विकिपीडिया चावडीवर विचारावेत.

[संपादन] नवा लेख लेख लिहितांना हे कराच

एखादा नवीन लेख लिहिताना काही गोष्टी कराव्या.

  • लेखाच्या तळाशी

== संदर्भ व नोंदी == <references/>===नोंदी===

हि नोंद आहे याची खात्री करून घ्यावी.

  • लेखाचे वर्गीकरण करावे. त्यासाठी लेखाच्या शेवटी [[वर्ग:वर्गाचे नाव]] लिहावे.
  • त्याऐवजी इंग्लिश (किंवा इतरभाषीय) आंतरविकि दुवा द्यावा. त्यासाठी [[en:Name of the English Article]] असे लिहावे.

[संपादन] नवीन लेख लिहिण्याचा सोपा उपाय

विकिपीडिआमध्ये नवीन लेखांची भर घालणे आता अधिक सोपे झाले आहे. त्यासाठी खालील रिकाम्या पृष्ठपेटीमध्ये तुम्हाला अपेक्षित लेखाचे नाव लिहा आणि 'नवीन लेख बनवा' लिहिलेल्या कळीवर टिचकी द्या.


[संपादन] विकिपीडिया लेख संपादन स्पर्धा‎

नमस्कार,

आपले नवीनतम सदस्य केदार सोमण यांनी सुचवल्यावरून मराठी विकिपीडियाने सर्वप्रथम लेख संपादन स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवले आहे. याची रूपरेषा ठरवण्यासाठी आपली मदत अत्यावश्यक आहे. याबद्दल प्राथमिक माहिती विकिपीडिया:लेख संपादन स्पर्धा‎ येथे आहे.

आपले मत व मदत तेथे अपेक्षित आहे.

[संपादन] हे सुद्धा पहा