नंदकिशोर बल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नंदकिशोर बल (२२ डिसेंबर, इ.स. १८७५ - १ जुलै, इ.स. १९२८) हे उडिया भाषेतील कवी, कादंबरीकार होते. पल्लीकबी - अर्थात "खेड्यापाड्यांचा कवी" - या नावाने यांना संबोधले जाते. यांनी शंभराहून अधिक सुनीते लिहिली.
प्रकाशित साहित्य [संपादन]
नंदकिशोर बल यांनी लिहिलेल्या कविता निर्झरिणी, पल्लीचित्र, बसंतकोकिला, तरंगिणी, चारुचित्र, निर्माल्य, प्रभातसंगीत, संध्यासंगीत, कृष्णकुमारी', शर्मिष्ठा या काव्यसंग्रहातून प्रकाशित झाल्या आहेत.
कनकलता या नावाची कादंबरीही त्यांनी लिहिली. इ.स. १९२५ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीत संरंजामवादी ग्रामीण समाजव्यवस्थेत भिनलेल्या हुंडापद्धतीचे दुष्परिणाम आणि बालविधवांच्या हालअपेष्टांचे चित्रण आहे.
| साहित्यकृतीचे नाव | प्रकाशनवर्ष (इ.स.) | साहित्यप्रकार | भाषा |
|---|---|---|---|
| पल्लीचित्र | इ.स. १८९८ [१] | काव्यसंग्रह | उडिया |
| निर्झरिणी | इ.स. १९००[१] | काव्यसंग्रह | उडिया |
| चारुचित्र | इ.स. १९०२[१] | काव्यसंग्रह | उडिया |
संदर्भ व नोंदी [संपादन]
- ↑ १.० १.१ १.२ दास, शिशिरकुमार (इ.स. १९९१). अ हिस्टरी ऑफ इंडियन लिटरेचर : १८००-१९१० वेस्टर्न इंपेक्ट : इंडियन रिस्पॉन्स. साहित्य अकादमी, नवी दिल्ली, पृ. ३२६. आय.एस.बी.एन. ८१-७२०१-००६-०. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |