धारा घनता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धारा घनता (इंग्लिश:current density) हे प्रभाराच्या वहनाची घनता मोजण्याचे परिमाण आहे. एसआय एककांमध्ये हे परिमाण अम्पिअर प्रत्येकी वर्ग मीटर मधे मोजले जाते.

व्याख्या[संपादन]

विद्युत धारा घनता म्हणजे थोडक्यात विद्युत धारा I प्रत्येकी क्षेत्रफळ A होय. मर्यादा किंवा सीमाच्या संज्ञेत:-

J = \lim\limits_{A \rightarrow 0}\frac{I}{A}

किंवा भैदिक स्वरूपात-

J = \frac{\mathrm{d}I}{\mathrm{d}A} \, .

येथे,

J ही विद्युत धारा घनता
I, dI ही विद्युत धारा
A, dA हे क्षेत्रफळ (किंवा अधिक अचूकपणे क्षेत्र सदिश)