बेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(द्वीप या पानावरून पुनर्निर्देशित)
भारताच्या अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहामधील एक छोटे बेट

बेट अथवा द्वीप हा पृथ्वीवरील जमीनीचा असा भाग आहे जो चारही दिशांनी पाण्याने वेढला गेला आहे. बेट हे नदी, सरोवर, समुद्र इत्यादी कोणत्याही पाण्याच्या अंगामध्ये असू शकते व ते नैसर्गिक अथवा मानवनिर्मित असते. भौगोलिक रित्या समान व जवळजवळ असणाऱ्या बेटांच्या गटाला द्वीपसमूह असे म्हटले जाते.

जी बेटे जमिनीपासून जवळ आहेत त्यांना खंडीय बेटे तर जी दूर आहेत त्यांना महासागरी बेटे असे संबोधले जाते.

जगातील आकाराने सर्वात मोठी बेटे[संपादन]

खंड[संपादन]

क्रम भूभाग क्षेत्रफळ
(km2)
क्षेत्रफळ
(वर्ग मैल)
देश
1 आफ्रो-युरेशिया 84,400,000 32,500,000 अनेक
2 अमेरिका 42,300,000 16,400,000 अनेक
3 अंटार्क्टिका 14,000,000 5,400,000 कोणताही नाही
4 ऑस्ट्रेलिया 7,600,000 2,900,000 ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया

मोठी बेटे[संपादन]

क्रम नाव क्षेत्रफळ
(km2)[१]
क्षेत्रफळ
(sq mi)
देश
1 ग्रीनलॅंड* 2,130,800[२] 822,706 ग्रीनलँड ध्वज ग्रीनलँड (डेन्मार्क ध्वज डेन्मार्कचा घटक)
2 न्यू गिनी 785,753 303,381 इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया (पश्चिम पापुआपापुआ) आणि पापुआ न्यू गिनी ध्वज पापुआ न्यू गिनी
3 बोर्नियो 748,168 288,869 ब्रुनेई ध्वज ब्रुनेई, इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया (पश्चिम कालिमांतान, मध्य कालिमांतान, दक्षिण कालिमांतानपूर्व कालिमांतान) आणि मलेशिया ध्वज मलेशिया (साबासारावाक)
4 मादागास्कर 587,713 226,917 मादागास्कर ध्वज मादागास्कर
5 बॅफिन बेट 507,451[३] 195,928 कॅनडा ध्वज कॅनडा (नुनाव्हुत)
6 सुमात्रा 443,066 171,069 इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया (आचे, उत्तर सुमात्रा, पश्चिम सुमात्रा, बेंकुलू, रियाउ, जांबी, दक्षिण सुमात्रालांपुंग)
7 होन्शू 225,800 87,182 जपान ध्वज जपान
8 व्हिक्टोरिया बेट 217,291[३] 83,897 कॅनडा ध्वज कॅनडा (नॉर्थवेस्ट टेरिटोरीजनुनाव्हुत)
9 ग्रेट ब्रिटन 209,331 80,823 Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम (इंग्लंड, स्कॉटलंडवेल्स)
10 एलिस्मियर बेट 196,236[३] 75,767 कॅनडा ध्वज कॅनडा (नुनाव्हुत)


संदर्भ[संपादन]

  1. ^ "Islands By Land Area". Archived from the original on 2015-12-01. 2010-08-01 रोजी पाहिले.
  2. ^ "Joshua Calder's World Island Info". 2010-08-30 रोजी पाहिले.
  3. ^ a b c "Atlas of Canada". 2009-08-12. Archived from the original on 2013-01-22. 2010-08-30 रोजी पाहिले.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत