देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


देशमुख (राजा किंवा देश च प्रमुख)

हे मराठी आडनाव व क्षत्रिय पदवी आहे.
  • गावातील पाटलाची पदोन्नति होऊन देशमुखी होते, ५-१० पाटलांवर देशमुख वतनदार होता. देशमुखांना पूर्वी सरपाटील किंवा देशपाटील म्हटले जात असे नंतर ते देशमुख झाले.
  • 'देशमुख' हे छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासूनच्या काळातले, एक वरच्या दर्जाचे परंपरागत वतनदार असून वंशपरंपरेने आपली कामे सांभाळीत. ते त्यांच्या महाल किंवा परगणा नावाच्या महसुली विभागाचे मुख्य अधिकारी असत. अधिकार क्षेत्र वा परगण्याचे क्षेत्रफळाची व्याप्ती नुसार देशमुख ही पदवी वा देशमुखी हे वतन युरोपिअन घराणे-शाही तील 'ड्युक'चे समकक्ष आहे.
  • 'देशमुख' पदवी वा 'देशमुखी' हे वतन कोणत्याही एका विशिष्ट धर्म वा जातीचे संदर्भात नसून इतिहासकालीन हिंदू व मुस्लिम राजांनी, हिंदू मधील मराठा-कुणबी, ब्राह्मण यासह इतर जाती तसेच, मुस्लिम व जैन धर्मातील कुटुंबाना 'देशमुखी' बहाल केल्याचे दिसून येते. पण ९०% देशमुख कुणबी-मराठा जातीचे आहेत.
  • 'देशमुखी' म्हणजे लष्करी,फौजदारी,महसुली व न्यायालयीन अधिकारी होत. गावाचे संरक्षण जसे पाटील करी,तसे परगण्याचे संरक्षण देशमुख करी. लढाईच्या प्रसंगी पाटील व देशमुख यांनी,अमूक-एवढे सैन्य सरकारास पुरवावे, असे करार असत. गावात वसाहत करणे,शेती व उद्योगधंदे सुरू करणे आणि मध्यवर्ती सत्तेला विशिष्ट सारा गोळा करून देणे, ही देशमुखांची प्रमुख कामे असत.
  • 'देशमुख' पदवी प्राप्त कुटुंबाकडे अधिकार क्षेत्रापासून महसुल प्राप्त करणे यासोबतच, अधिकार क्षेत्रात वा परगण्यात मूलभूत सेवा व सुव्यवस्था राखणे ही जबाबदारी असे.
  • 'देशमुख' हे परागण्यातील सर्व जमाबंदीचा हिशोब ठेवीत आणि वसुलीवर देखरेख ठेवीत. यांच्याजवळ थोडीफार शिबंदी (सैन्य) असे आणि त्या लष्करी बळावर गढ्या, कोट बांधून त्यांत ते वास्तव्य करीत व आसपासच्या मुलाखात दंडेलगिरी करीत किंवा मध्यवर्ती सत्ता दुर्बळ असल्यास प्रदेशविस्तारही करीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशमुखांना काबूत आणण्यासाठी काहींची वतने काढून घेतली, तर काहींशी समझोता करून त्यांना आपल्या स्वराज्याच्या कार्यात सामावून घेतले. अनेक देशमुखांच्या वरचा अधिकारी तो सरदेशमुख.
  • देशमुखांचा शासकीय शेतसाऱ्यावर दोन ते पाच टक्क्यांपर्यंत हक्क असे. कुठेकुठे धान्यावरही यांचा तीन टक्के व रोख रकमेवर सात टक्के हक्क असे. याशिवाय त्यांना इनामी जमिनी असत. हे काम करणारी काही माणसे आपल्या आडनावाला देशमुख हा शब्द जोडत. ब्रिटिशांच्या राजवटीत देशमुखी संपली आणि देशमुख आणि सरदेशमुख हे शब्द फक्त आडनावांत राहिले.
  • निजाम राज्यात मात्र १९४८ पर्यंत देशमुख वतने अस्तित्वात होती.


देशमुख चे कार्य व अधिकार[संपादन]

  • शासक व शासन
  • राजस्व अधिकारी व राजस्व वसूली
  • न्यायमूर्ति व न्याय
  • रक्षक व रक्षा
  • राजे व पाटीलांचा (क्षत्रियांचा) प्रमुख

देशमुख आडनावाच्या काही प्रसिद्ध मराठी व्यक्ती[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]