देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देशमुख हे मराठी आडनाव आहे.

देशमुख हे शिवाजीच्या काळाच्या आधीपासूनच्या काळातले, एक वरच्या दर्जाचे परंपरागत वतनदार असून वंशपरंपरेने आपली कामे सांभाळीत. ते त्यांच्या महाल किंवा परगणा नावाच्या महसुली विभागाचे मुख्य अधिकारी असत. देशमुखी म्हणजे लष्करी व फौजदारी अधिकारी होत. गावाचे संरक्षण जसे पाटील करी, तसे परगण्याचे संरक्षण देशमुख करी. लढाईच्या प्रसंगी पाटील व देशमुख यांनी अमूक एवढे सैन्य सरकारास पुरवावे, असे करार असत. गावात वसाहत करणे, शेती व उद्योगधंदे सुरू करणे आणि मध्यवर्ती सत्तेला विशिष्ट सारा गोळा करून देणे, ही देशमुखांची प्रमुख कामे असत. हे परागण्यातील सर्व जमाबंदीचा हिशोब ठेवीत आणि वसुलीवर देखरेख ठेवीत. यांच्याजवळ थोडीफार शिबंदी (सैन्य) असे आणि त्या लष्करी बळावर गढ्या, कोट बांधून त्यांत ते वास्तव्य करीत व आसपासच्या मुलाखात दंडेलगिरी करीत किंवा मध्यवर्ती सत्ता दुर्बळ असल्यास प्रदेशविस्तारही करीत. शिवाजीनी या देशमुखांना काबूत आणण्यासाठी काहींची वतने काढून घेतली, तर काहींशी समझोता करून त्यांना आपल्या स्वराज्याच्या कार्यात सामावून घेतले. अनेक देशमुखांच्या वरचा अधिकारी तो सरदेशमुख.

देशमुखांचा शासकीय शेतसाऱ्यावर दोन ते पाच टक्क्यांपर्यंत हक्क असे. कुठेकुठे धान्यावरही यांचा तीन टक्के व रोख रकमेवर सात टक्के हक्क असे. याशिवाय त्यांना इनामी जमिनी असत. हे काम करणारी काही माणसे आपल्या आडनावाला देशमुख हा शब्द जोडत. ब्रिटिशांच्या राजवटीत देशमुखी संपली आणि देशमुख आणि सरदेशमुख हे शब्द फक्त आडनावांत राहिले.

देशमुख आडनावाच्या काही प्रसिद्ध मराठी व्यक्ती [संपादन]


’देशमुख’ जोडलेली काही आडनावे
  • कडू देशमुख,
  • कोंडे देशमुख,
  • चव्हाण देशमुख
  • जगताप देशमुख,
  • जाधव देशमुख,
  • जेधे देशमुख,
  • ढमाले देशमुख
  • धुमाळ देशमुख,
  • पासलकर देशमुख,
  • माने देशमुख,
  • राजेशिर्के देशमुख,
  • शिंदे देशमुख,
  • शिळीमकर देशमुख,
  • हांडे देशमुख.

पहा : आडनावे (भारतीय) : :