देव आनंद
| देव आनंद | |
देव आनंद |
|
| पूर्ण नाव | धरमदेव आनंद |
| जन्म | सप्टेंबर २६, इ.स. १९२३ गुरुदासपूर, पंजाब, ब्रिटिश भारत |
| मृत्यू | डिसेंबर ३, इ.स. २०११ लंडन, युनायटेड किंग्डम |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
| राष्ट्रीयत्व | पंजाबी, भारतीय |
| भाषा | पंजाबी (मातृभाषा) हिंदी भाषा (अभिनय) |
धरमदेव आनंद (पंजाबी: ਧਰਮਦੇਵ ਆਨੰਦ ; हिंदी: धरम देव आनन्द ; रोमन लिपी: Dev Anand) ऊर्फ देव आनंद (सप्टेंबर २६, इ.स. १९२३; गुरुदासपूर, पंजाब, ब्रिटिश भारत - डिसेंबर ३, इ.स. २०११; लंडन, युनायटेड किंग्डम) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक होते. सुमारे ६५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी ११४ चित्रपटांमध्ये अभिनय केला. भारताच्या केंद्रशासनाने इ.स. २००१ साली पद्मभूषण पुरस्कार, तर इ.स. २००२ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांचे चित्रपटक्षेत्रातील योगदान गौरवले.
अनुक्रमणिका |
[संपादन] जीवन
इ.स. १९४६ साली देव आनंद यांच्या कारकिर्दीला 'हम एक है' या चित्रपटाने सुरवात झाली. इ.स. १९४९ मध्ये त्यांनी नवकेतन फिल्म कंपनी बनवली आणि ३५ हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर गेली अनेक दशके त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवला. गीता बाली, वहिदा रेहमान, मधुबाला अशा अनेक नामवंत अभिनेत्रींसोबत त्यांनी अनेक चित्रपट केले. हम दोनो, अमीर गरीब, गाईड, पेइंग गेस्ट, बाजी, ज्वेल थीफ, सीआयडी, जॉनी मेरा नाम, वॉरंट, देस परदेस हे आणि असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. देव आनंद यांची अनेक गाणी गाजली. तू कहा ये बता, देखे रूठा ना करो, दिल का भवर करे पुकार, गाता रहे मेरा दिल, मै जिंदगी का साथ निभा था चला गया, दिन ढल जाये, छोड दो आंचल अशी अनेक गाणी प्रचंड गाजली.
संगीतप्रधान हिंदी चित्रपटांतून रंगवलेल्या त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. केसांचा महिरपी तुरा, गुलछबू आणि देखणी चेहरेपट्टी यांमुळे उठून दिसणार्या त्यांच्या फॅशनदार व्यक्तिमत्त्वाने चित्रपटरसिकांच्या हृदयात स्थान मिळवले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ग्रेगरी पेक या अभिनेत्याशी तुलना केली जाई[१].
[संपादन] मृत्यू
देव आनंद यांचा ३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी वयाच्या ८८व्या वर्षी लंडन, इंग्लंड मुक्कामी हृदयक्रिया बंद पडून मृत्यू झाला. ते वैद्यकीय तपासण्यांसाठीच लंडन येथे गेले होते[ संदर्भ हवा ].
[संपादन] चित्रपट कारकिर्द
इ.स. १९४६ - हम एक है - प्रभातच्या सिनेमातून सुरुवात इ.स. १९४७ - जिद्दी- पहिला हीट सिनेमा-गुरूदत्त यांचं दिग्दर्शन
[संपादन] प्रसिद्ध चित्रपट
जिद्दी, पेईंग गेस्ट,बाजी, ज्वेल थिप, सीआयडी, जॉनी मेरा नाम, अमीर गरीब, गाईड, वॉरंट, हरे रामा हरे कृष्णा आणि नौ दो ग्यारह.
[संपादन] पुरस्कार
- इ.स. १९५० - काला पाला चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टर, फिल्मफेअर पुरस्कार
- इ.स. १९६५ - गाइड चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टर, फिल्मफेअर पुरस्कार
- इ.स. २००१ - पद्मभूषण पुरस्कार
- इ.स. २००२ - दादासाहेब फाळके पुरस्कार
- इ.स. २००० - भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल अमेरिकेतर्फे सन्मान,हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला होता.
- इ.स. २००० - इंडो-अमेरिकन असो.चा स्टार ऑफ मिलेनियम सिलीकॉन व्हलीत हा सन्मान करण्यात आला होता.
[संपादन] संदर्भ व नोंदी
- ↑ "बॉलिवुड्स 'ग्रेगरी पेक', देव आनंद, डाइज अॅट ८८ (बॉलिवुडाचा 'ग्रेगरी पेक', देव आनंद, वयाच्या ८८व्या वर्षी निवर्तला)", माँत्रेयाल गॅझेट, ४ डिसेंबर, इ.स. २०११. ५ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी तपासले. (इंग्लिश मजकूर)
[संपादन] बाह्य दुवे
- देव आनंद आय.एम.डी.बी. संकेतस्थळावर (इंग्लिश मजकूर)
- सदाबहार देव आनंद देवाघरी. महाराष्ट्र टाइम्स (४ डिसेंबर, इ.स. २०११). (मराठी मजकूर)
- ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांचे निधन. सकाळ (४ डिसेंबर, इ.स. २०११). (मराठी मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |