दूध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दुध या पानावरून पुनर्निर्देशित)

सस्तन प्राण्याच्या मादीच्या स्तनांतून स्त्रवणारा एक पांढरा द्रव पदार्थ.

दूध


दूध निर्मिती हा सस्तन प्राण्यांचा विशेष गुणधर्म आहे.

नवजात अर्भकासाठी दूध हे पोषक अन्न आहे, सुरुवातीच्या दुधात रोग प्रतिकारक पदार्थही असतात.

[संपादन] माणसांच्या आहारातील दूधाचे स्थान

जगभरामधे दूध व दूग्धजन्य पदार्थांचा वापर एक अन्नपदार्थे म्हणून केला जातो. मनुष्यप्राणी फार पूर्वीपासून दूधाचे सेवन करत आला आहे. त्यासाठी खास दूध देणारे प्राणी पाळण्यात येतात. दुग्धोत्पादनासाठी प्रामुख्याने गायी पाळण्यात येतात. त्या खालोखाल शेळी, मेंढी, म्हैस या प्राण्यापासून दूध मिळवले जाते. दुग्धोत्पादनासाठी भौगोलिकतेप्रमाणे उपलब्ध प्राणी जसे उंट, याक, मूस आदींचाही वापर केला जातो. कमी अधिक प्रमाणात घोडा, गाढव, रेनडियर, झेब्रा या प्राण्यांपासून दुग्धोत्पादन होते. दूधापासून दही, लोणी, चीज, क्रिम, योगर्ट, आईसक्रीम आदी अनेक पदार्थे तयार केले जातात ज्यांचा आहारात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

[संपादन] दूधावरील प्रक्रिया : पाश्चरायझेशन व होमोजिनायझेशन

पाश्चरायझेशन या प्रक्रियेत दुध ठरावीक काळासाठी ठरावीक तापमानावर तापवण्यात येते. या प्रक्रियेमुळे दूधातील हानीकारक जीवाणू नष्ट होऊन माणसांच्या पिण्यालायक होते तसेच त्याचे आयुष्यमानही वाढते. होमोजिनायझेशन प्रक्रियेत दुधातील स्निग्धकण फोडून ते एकजीव करण्यात येते व ते नासणार नाही याची काळजी घेऊन थंड करण्यात येते.

[संपादन] दुधाचे विविध उपयोग

दुधाचा उपयोग विविध खाद्य पदार्थात केला जातो. तसेच दुधाचा वापर मंदिरात अभिषेक करण्यासाठी केला जातो. दुधाचा उपयोग हा सौंदर्यप्रसाधन म्हणून ही केला जातो.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये