दिवाळी अंक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


दिवाळीअंक हे मराठी वाङमयीन संस्कृतीचे वैशीष्ट्यपूर्ण अंग आहे. दिवाळी सणाच्या सुमारास निघणाऱ्या विशेष अथवा वार्षिक नियतकालिकांना दिवाळी अंक असे म्हणतात.

मनोरंजन हा सन १९०९ साली छापला गेलेला मराठीतला प्रथम दिवाळी अंक होता.[१] सन २००९ मध्ये दिवाळी अंकांचे शतक पूर्ण झाले आहे.दिवाळीचा फराळ, फटाके, मिठाया या समवेतच दिवाळी अंक ही सुशिक्षित व साहित्यप्रेमी घरांसाठी एक आवश्यक घटक आहे. पूर्वीचे दिवाळी अंकात मनोरंजनासमवेतच परंपरा,संस्कृती याची माहिती असे. काळानुरूप त्यात बदल झाला आहे. महाराष्ट्रात सुमारे ८०० च्या जवळपास दिवाळी अंक प्रदर्शित होतात.


अनेक मराठी वृत्तपत्रेही वाचकांसाठी दिवाळी अंक काढत आहेत.त्यासोबतच आरोग्य,खेळ यासारख्या अनेक विषयांना वाहिलेले दिवाळी अंकदेखील छापण्यात येतात. या सोबतच ऑडियो व्हीज्युअल दिवाळी अंकही निघत आहेत.

स्वरूप आणि परंपरा[संपादन]

कवियत्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या मते एके काळी वाचकांनाही झिंग यावी अशा अंकांची निर्मिती होत असे. अनेक लेखक आपले उत्कृष्ट लेखन दिवाळी अंकासाठी राखून ठेवायचे. दिवाळी अंकांनी वाचकांना वाङ्मयीन दृष्टी दिली. वाचक अभिरुचीवर संस्कार करणे आणि लेखकांना नवनिर्मितीसाठी उद्युक्त करणे अशी दुहेरी जबाबदारी दिवाळी अंकांनी समर्थपणे पेलली आहे. त्यामुळेच दिवाळीचा सण केवळ चार दिवसांपुरताच मर्यादित न राहता कालविस्तार करून तो चार महिन्यांचा झाला. लेखक नसलेल्या विविध क्षेत्रांतील लोकांना लिहिते करण्याचे काम दिवाळी अंकांनी केले आहे. [२] चंद्रहास जोशींच्या मते "दिवाळी अंकाची एक ठराविक चाकोरी निर्माण झालेली असली, तरी काही विशिष्ट क्षेत्र निवडून वाचकांना विचारप्रवण करण्याची योजकंताही त्यांतून दिसून येते. विशेषतः काही दिवाळी अंकांतून महत्त्वपूर्ण परिसंवादांचे पद्धशीर संयोजन केले जाते व त्यामुळे त्यांची उपयुक्तता कायम स्वरूपाची ठरते."[३]

इतिहास[संपादन]

१९०५ साली श्री. बाळकृष्ण विष्णू भागवत यांच्या 'मित्रोदय' या मासिकाने दिवाळी विशेष अंक काढला होता. 'नोव्हेंबर दिवाळीप्रीत्यर्थ' असा उल्लेख या मासिकावर होता. पूर्णपणे वाङ्मयाला प्राधान्य देणारा हा अंक होता. २४ पानांच्या या अंकात कादंबरी, चरित्र, वैचारिक निबंध असा मजकूर होता. १६ पानं मराठीत आणि ८ पानं इंग्रजीत होती.रुढार्थानं हा दिवाळी अंक नसला तरी, वा. गो. आपटे ह्यांच्या संपादनाखाली प्रकशित आनंद मासिकाच्या १९०७ आणि १९०८ च्या ऑक्टोबर अंकातून दिवाळी निमीत्त विशेष लेख प्रसिद्ध झाले होते.[४] दिवाळी अंक या उद्देशास वाहून घेतलेल्या पहिल्या दिवाळी अंकाचा मान काशिनाथ रघुनाथ मित्र(२ नोव्हेंबर १८७१ - २३ जून १९२०[५]) यांनी संपादित केलेल्य १९०९ साली प्रकाशित 'मनोरंजन' दिवाळी अंकास जातो.

दिवाळी अंकांचे प्रकार[संपादन]

ऑनलाईन आणि डिजीटल दिवाळी अंक[संपादन]

कविता सागर दिवाळी अंकाला पुरस्कार[संपादन]

साप्ताहिक उल्हास प्रभात, ठाणे आणि आरोग्य होमिओपॅथीक फार्मसी यांच्यातर्फे राज्यस्तरीय दिवाळी अंक 2013 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या मध्ये महाराष्ट्रातील शेकडो दिवाळी अंकांनी आपला सहभाग नोंदवला होता. मराठी माणसाच्या दिवाळीचा जणू अविभाज्य भाग झालेल्या दिवाळी अंकांच्या शतकोत्तर परंपरेचे औचित्य साधून यंदाच्या उत्कृष्ट दिवाळी अंकांना पुरस्कार देण्यासाठी आयोजित केलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, जयसिंगपूर येथून जाहिरात विरहित व केवळ कवितांसाठी प्रसिद्ध होणा-या "कविता सागर" दिवाळी अंकाने उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पारितोषिक पटकावले आहे. लवकरच ठाणे येथे होणा-या पुरस्कार वितरण सोहळ्यात "कविता सागर" चे प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी संस्कृतीचे जतन करण्यासाठी आणि दिवाळी अंकांची सुरू असलेली 105 वर्षांची परंपरा यापुढेही कायम राहावी, तसेच वाचकांना यापुढेही दर्जेदार दिवाळी अंक वाचायला मिळावेत, यासाठी ही स्पर्धा आयोजित केल्याचे व या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे उल्हास प्रभातचे संपादक गुरुनाथ बनोटे यांनी सांगितले.

उदयोन्मुख कवी यांचं एक हक्काचं व्यासपीठ कविता सागर प्रकाशन यांच्या वतीने प्रकाशित एक आगळा वेगळा व कौतुकास पात्र ठरलेला, अनेक नवकवींच्या कवितांना सर्वप्रथम स्थान देणारा व फक्त केवळ कवितांसाठी असलेला एकमेव दिवाळी अंक "कविता सागर" गेल्या वर्षी सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला होता. कविता सागर दिवाळी अंक जगभरात कुठेही फक्त एका क्लिकवर उपलब्ध करून दिल्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून वाचनाचा नवा मार्ग स्वीकारणा-या नव्या दमाच्या वाचकांसाठी एक पर्वणी ठरला होता. या वर्षीचा अंक सर्वदूर पोहचविण्यासाठी संपादक मंडळाने चांगले प्रयत्न केले आहेत. 01 नोव्हेंबर 2013 रोजी दिवाळी अंक प्रसिद्ध होवून सर्वत्र वितरीत केला गेला. कविता सागर सर्व लेखक कवी यांच्या साहित्याला प्रसिद्धी देण्यासाठी काम करत आहे. आत्तापर्यंत कविता सागर प्रकाशनाने अनेक लेखक कवी यांचे साहित्य प्रसिध्द केले आहे, आणि नुसतेच प्रसिद्ध केले नाही तर हे सर्व लिखाण जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचवले आहे, यावर्षीचा दिवाळी अंक हा जगभरातील ई-दिवाळी अंकांच्या यादीत पहिल्या दहा मध्ये आहे. कविता सागर मधील सर्वच साहित्य वाचनीय, हृदयस्पर्शी आहे. नवीन लेखक, कवी प्रकाशात यावेत म्हणून नवोदितांना 'एक चांगले व्यासपीठ' निर्माण झाले आहे. या सर्व साहित्याचा आस्वाद घेऊ इच्छिणा-या रसिक वाचकांना इंटरनेटवरील दिवाळी अंक उपयुक्त ठरणारा आहे. कविता सागर हा दिवाळी अंक इंटरनेट बरोबरचं आयपॅड व स्मार्ट फोनवरही उपलब्ध आहे.

बाळ बाबर, डी. बी. चिपरगे, डॉ. कुमार पाटील, डॉ. उमेश कळेकर, अनिल पाटील, त्रिवेणी हरोले, सौ माधुरी काजवे, सौ. स्वप्नजा घाटगे, किरण पाटील, विजय बेळंके, दिशा शिंदे, अनिल धुदाट, प्रकाश केसरकर, डॉ. विजयकुमार माने, शांतीनाथ पाटील, जयंत पठाडे, प्रा. दिवाकर बोबडे, मयुर ढोलम, उज्ज्वला माघाडे, मयुरी नाईक, डॉ. नंदकुमार नहार, पूजा डकरे, रमेश इंगवले, सुहास समडोळे, शफी बोल्डेकर, अशोक पाटील, विष्णू वासुदेव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या कवितांनी या अंकाची उंची वाढवली आहे.

गतवर्षी कविता सागरच्या दिवाळी अंकाला आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता. ठाणे येथील हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल, “कविता सागर” च्या अतिथी संपादिका - सौ. विजया प्रकाश पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कविता सागर प्रकाशन गेल्या अनेक वर्षांपासून "कविता सागर" या दिवाळी अंकाची सातत्याने निर्मिती करीत आहे.

ऑडिओ व्हिजूअल दिवाळी अंक[संपादन]

दिवाळी अंक झालेल्या स्पर्धा[संपादन]

(या विभागात प्रस्तावित स्पर्धांची माहिती मुळीच देऊ नये.झालेल्या स्पर्धांत पुरस्कृत दिवाळी अंकांच्या/लेखांच्या/लेखकांच्या संदर्भाने केवळ ससंदर्भ परिच्छेद लेखन करावे.पुरस्कृत दिवाळी अंकांची यादी स्पर्धा आणि पुरस्कार प्राप्त दिवाळी अंकांची यादी येथे जोडावी.)

दिवाळी अंकाच्या संपादकांचे अधिवेशन[संपादन]

  • इ.स.२०१३ -आयोजक "दिवा प्रतिष्ठान" [२]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/47747
  2. २.० २.१ डॉ. अरुणा ढेरे (दिवाळी अंकांच्या संपादकांच्या अधिवेशनाचे वृतांकन:दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी पुणे). "कसदार साहित्याचा प्रभाव हे दिवाळी अंकांचे वैशिष्टय़ लुप्त होत आहे - डॉ. अरुणा ढेरे", prahaar.in, Monday, October 7, 2013. "कसदार साहित्याचा प्रभाव हे दिवाळी अंकांचे वैशिष्टय़ लुप्त होत आहे - डॉ. अरुणा ढेरे ’" हे :दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी पुणे यांचा वृतांकन दिनांक २ नव्हेंबर २०१३ भाप्रवे सकाळी ९ वाजता रोजी तपासले. (मराठी मजकूर) 
  3. http://www.marathivishwakosh.in/khandas/khand8/index.php?option=com_content&view=article&id=9621&Itemid=2
  4. दिवाळी अंकांची शंभरी लेखक -chinoox, मायबोलीचा ऑनलाईन हितगुज दिवाळी अंक २००८ दिनांक २७/०१/२०१३ रोजी भाप्रवे सकाळी ९.३६ वाजता जसा दिसला
  5. http://marathivishwakosh.in/khandas/khand13/index.php?option=com_content&view=article&id=10387