दारुहळद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दारुहळद

दारुहळद (शास्त्रीय नाव: Berberis aculeata वैकल्पिक नाव: Berberis aristata) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. दारुहळदीचा वृक्ष लहान आणि काटेरी असतो. याचे कांड(खोड) फिकट उदी रंगाचे असून आतून पिवळे असते. ते चिवट आणि सहज न तुटणारे असते. पाने निळसर, काटेरी आणि लंबाकृती असतात. मार्च ते मे या काळात झाडाला पिवळी फुले येतात.

नैसर्गिक आढळ : नरम रेतीयुक्त जमिनीत, थंड हवेच्या ठिकाणी, हिमालयाच्या पहाडांवर, आसामात, निलगिरी पर्वतावर आणि छोटा नागपूर विभागात.

उपयोग : याच्या कांडाचा काढा सर्व प्रकारच्या तापांवर गुणकारी आहे. क्विनाईनपेक्षा हे औषध जास्त गुणकारी आहे.[ संदर्भ हवा ] हाडीताप, डेंगी, कावीळ, प्लीहादोष, यकृतविकार, रक्ती मुळव्याध आणि डोळ्यांच्या विकारांवर दारुहळदीचा औषधोपचार करतात. दारुहळदीपासून रसांजन आणि रसोत या नावाची औषधे बनतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.