दाग हामारहोएल्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दाग हामारहोएल्ड

कार्यकाळ
१० एप्रिल १९५३ – १८ सप्टेंबर १९६१
मागील त्रिग्वे ली
पुढील उ थांट

जन्म २९ जुलै १९०५ (1905-07-29)
योनक्योपिंग, स्वीडन
मृत्यू १८ सप्टेंबर, १९६१ (वय ५६)
न्दोला, ऱ्होडेशिया व न्यासालॅंड (आजचा झाम्बिया)
राष्ट्रीयत्व स्वीडिश

दाग हामारहोएल्ड (स्वीडिश: Sv-Dag_Hammarskjöld.ogg Dag Hjalmar Agne Carl Hammarskjöld ; २९ जुलै १९०५ - १८ सप्टेंबर १९६१) हा एक स्वीडिश अर्थतज्ञ, लेखक व संयुक्त राष्ट्रांचा दुसरा सरचिटणीस होता. तो सरचिटणीस पदावर १९५३ ते १९६१ सालच्या मृत्यूपर्यंत होता.

सरचिटणीसपदावर असताना हामारहोएल्डने इस्रायल व अरब जगतादरम्यान शांतता निर्माण होण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तसेच आफ्रिकेतील कॉंगो देशामध्ये चालू असलेले युद्ध थांबवण्याचे त्याचे प्रयत्न वाखाणले गेले. येथे जात असताना सप्टेंबर १९६१ साली त्याच्या विमानाला झालेल्या अपघातामध्ये हामारहोएल्ड मृत्यूमुखी पडला. त्याच वर्षी त्याला मृत्यूनंतर नोबेल शांतता पुरस्कार दिला गेला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीने हामारहोएल्डला विसाव्या शतकामधील सर्वोत्तम मुत्सद्दी अशी श्रद्धांजली दिली.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: