दनु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू पौराणिक साहित्यानुसार दनु (मराठी लेखनभेद: दनू ; संस्कृत: दनु) ही कश्यपाची पत्नी व दानव वंशाची माता होती. ही दक्ष प्राचेतस प्रजापती व त्याची पत्नी असिक्री यांची कन्या होती[१].

वंश[संपादन]

कश्यपापासून हिला झालेले पुत्र दानव या मातृक नावाने संबोधले जातात. शतपथ ब्राह्मणानुसार वृत्र दनूचा पुत्र होता. महाभारतमते हिला विप्रचित्ति आदी ३४ पुत्र होते[१]. पौराणिक साहित्यात अन्यत्र हिला १२६ पुत्र होते, असे उल्लेख आढळतात[१]. तिच्या पुत्रांपैकी केशिन्, तारक, नमुचि, नरक, बाण, विप्रचित्ति, वृषपर्वन्, शंबर, हिरण्यकश्यपू हे पुत्र विशेष ख्यात झाले.

मंदिरे[संपादन]

दनूस पूज्य देवी मानून बांधलेली दोन मंदिरे इंडोनेशियात बाली बेटावर आहेत :एक ब्रातान तळ्याजवळ असलेले पुरा उलुन दनु मंदिर व दुसरे पनेलोकान या स्थानानजीकचे उलुन दनु बातुर मंदिर.

संदर्भ[संपादन]

  1. १.० १.१ १.२ (इ.स. १९६८) सिद्धेश्वरशास्त्री चित्राव: भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश. भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे. (मराठी मजकूर) 


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.