त्रिकोणमिती
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
त्रिकोणाच्या, विशेषतः काटकोन त्रिकोणाच्या बाजू आणि कोन यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करणार्या गणितशाखेस त्रिकोणमिती असे म्हणतात. प्राचीन काळापासून खगोलशास्त्र, वास्तुरचनाशास्त्र, अंतर - मापन यासाठी त्रिकोणमितीचा वापर होतो. पृष्ठीय त्रिकोणमितीच्या संकल्पना वापरून गोलीय तसेच वक्र भूमितीचा अभ्यास करता येतो. या दोन शाखांचा संकर करून गोलीय त्रिकोणमिती ही शाखा निर्माण झाली आहे.