तेरेखोल किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तेरेखोलचा किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)
तेरेखोल किल्ला

तेरेखोल किल्ला
नाव तेरेखोल किल्ला
उंची २४० फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण गोवा
जवळचे गाव तेरेखोल, रेडी, पणजी
डोंगररांग
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


तेरेखोल किल्ला हा भारताच्या गोवा राज्यातील एक किल्ला आहे. गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतीकारकांना निवारा देण्याचे मोठे काम तेरेखोलने केले आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

तेरेखोल किल्ला हा भारताच्या गोवा राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला गोव्याचा उतेराकडील टोकाला आहे.[१]

इतिहास[संपादन]

तेरेखोलचा हा किल्ला गोव्याच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान बाळगून आहे. तेरेखोलच्या खाडीच्या तीरावर सावंतवाडीच्या राजाने या किल्ल्याचे बांधकाम केले. त्यानंतर १७४६ मध्ये पोर्तुगीजांनी डॉम पेड्रो डी अलमेडाच्या नेतृत्वाखाली हा किल्ला जिंकून घेतला आणि त्यात काही बदल केले. त्यानंतर मराठे आणि नंतर पुन्हा पोर्तुगीजांनी या किल्ल्याचा ताबा घेतला. हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात १८१८ मध्ये असल्याने बाकी किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचे नुकसान झाले नाही. किल्ल्याच्या बांधकामात कोकणी, पोर्तुगीज आणि गॉथिक वास्तुशैलीची छाप दिसते. १९२५ मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध डॉ. बर्नाडो पेरेझ डिसूझा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्या वहिल्या गोवन बंडाची आखणी याच तेरेखोल किल्ल्यावरून केली गेली. १९६१ मध्येही पोर्तुगीजांविरुद्धच्या गोवा मुक्तिसंग्रामाच्या वेळी या किल्ल्याचा एक तळ म्हणून मुक्तिसैनिकांनी वापर केला. गोव्यात एकूणच पर्यटन विकासाचा वेग चांगला असल्याने गोवा शासनाने या किल्ल्याचे हॉटेलमध्ये रूपांतर केले.

छायाचित्रे[संपादन]

कसे जाल[संपादन]

तेरेखोलला जाण्यासाठी महाराष्ट्र आणि गोव्यातून दोन मार्ग उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातून जाताना वेंगुर्ले, रेडी मार्गे तेरेखोलला पोहोचता येते. गोव्यातून येताना पणजी, अरंबोळ, केरीं मार्गे तेरेखोलची खाडी फेरी बोटीतून ओलांडून यावे लागते. फेरीबोटची सुविधा दिवसभर उपलब्ध असते. अगदी चारचाकी गाडीदेखील फेरीबोटमधून अत्यल्प शुल्कात नेता येते.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

सध्या या किल्ल्याचे रूपांतर हेरिटेज रिसॉर्टमध्ये केले गेले आहे. त्यामुळे किल्ल्याच्या अंतर्गत भागाचे अतिशय सुंदर पद्धतीने संवर्धन झाले आहे. किल्ल्यापेक्षा पर्यटन स्थळ म्हणून विकास चांगला झाला आहे. रस्ता थेट हॉटेलच्या दारापर्यंत आला आहे. आजूबाजूला चांगली बाग करण्यात आली आहे. तटबंदी दुरुस्त करून रंग रंगोटी करण्यात आली आहे.

किल्ल्याच्या रिसॉर्ट असलेल्या भागात सामान्य पर्यटकांना निःशुल्क फिरण्याची अनुमती आहे. आवारात जुनी आठवण म्हणून आतमध्ये बांधीव तटबंदी, बुरुज आणि एक प्राचीन सुस्थितीत असलेले सेंट ॲंथनी चर्च आहे. बहुतांश वेळा ते बंद असते. तटबंदीवरून तेरेखोलच्या खाडीचे आणि पलीकडे असणाऱ्या गोव्याच्या माडबनांचे विहंगम दृश्य दिसते.

या सगळ्यात गोवा मुक्ती संग्रामात लढलेल्या क्रांतिकारकांचे स्मारक मात्र खूपच वाईट स्थितीत आहे.

गडावरील राहायची सोय[संपादन]

राहायची सोय सामान्य पर्यटकांसाठी नाही. हॉटेलमध्ये राहायची सोय मात्र आहे.

गडावरील खाण्याची सोय[संपादन]

गडावरील खाण्याची सोय नाही.

गडावरील पाण्याची सोय[संपादन]

गडावरील पाण्याची सोय आहे.

संदर्भसाहित्य[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Terekhol Fort in Panaji district". http://maharashtrafort.com. Archived from the original on 2019-03-09. १ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)

हे सुद्धा पहा[संपादन]

भारतातील किल्ले