तुलसी गॅब्बार्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तुलसी गॅब्बार्ड (एप्रिल १२, इ.स. १९८१ - ) ही अमेरिकेच्या हवाई राज्यातील राजकारणी आहे. २०१२च्या निवडणुकांत गॅब्बार्ड हवाईच्या दुसऱ्या काँग्रेशनल प्रभागातून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या सदस्यत्वाची निवडणूक जिंकली. सदस्यत्वाची शपथ घेतल्यावर गॅबार्ड या गृहात पदधारण करणारी सर्वप्रथम हिंदू व्यक्ती ठरेल.[१] यापूर्वी गॅब्बार्ड होनोलुलुच्या महापालिकेची सदस्य होती तसेच हवाईच्या प्रतिनिधिगृहातील सगळ्यात लहान सदस्यही होती.

गॅब्बार्ड सध्या हवाई आर्मी नॅशनल गार्डमध्ये कंपनी कमांडर आहे. ती दोन वेळा मध्यपूर्वेत सेवारत होती. याशिवाय गॅब्बार्ड हेल्थी हवाई कोलिशन या संस्थेची सहसंस्थापक आणि उपाध्यक्षही आहे.

संदर्भ आणि नोंदी [संपादन]

  1. "Tulsi Gabbard wins seat in Hawaii's 2nd Congressional District".