तार्कीक उणीवा
तर्कातील त्रुटी आणि उणीवां मुळे अशा निष्कर्षांचा आभास होतो जे मुलत: उणीवयुक्तच रहातात, तर्कातील अशा त्रुटी आणि उणीवांना तर्कदोष असे म्हणतात. मराठी भाषेत क्वचीत हेत्वाभास अथवा तर्कदुष्ट हे शब्द वापरलेले दिसतात परंतू तार्किक उणीवांची निर्मिती,श्रोत्यास वाचकास फसवण्यासाठी हेतुत: अथवा दुष्टपणातूनच झाली असेल असे नाही. युक्तिवादाच्या मुळाशी असलेली गृहीते चिकित्सक दृष्टीने अभ्यासण्यात तपासण्यात झालेल्या गफलतींमुळे एखादे गृहीत तत्व विचारात घ्यावयाचे राहून गेल्याने अथवा गृहीतांना योग्य प्रमाण लक्षात घेणे राहील्यामुळे अथवा अनवधानाने सुद्धा तार्कीक त्रुटी आणि उणीवांची निर्मिती होते.
तार्किक उणीवांचे दोष युक्तिवाद आणि निष्कर्षांना दुबळेपणा आणत असलेतरी वरकरणी सत्याचा आभास निर्माण करण्यात आणि त्यावर आधारीत श्रद्धा विश्वास निर्माण करत मने वळवण्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वीसुद्धा होताना दिसतात.हेतुत्: असो नसो श्रोता वाचकवर्ग मोठ्या प्रमाणावर फसतात सुद्धा.
स्पष्ट आणि चपखल शब्दांची निवड अथवा युक्तिवादाचे समर्थन करण्याकरीता पार्श्वभूमीका सबळपणे मांडण्यात आलेल्या अपयशाने सुद्धा तार्कीक उणीवांची निर्मिती होऊ शकते. तार्किक उणीवांचे दोष युक्तिवाद आणि निष्कर्षांना दुबळेपणा आणत असलेतरी ती केवळ युक्तीवाद मांडणाऱ्या व्यक्तिची मांडणी क्षमतेची मर्यादा असू शकते. तर्कदोषांनी दुबळे झालेले युक्तीवादाने समर्थनाचा प्रयत्न झालेले निष्कर्ष विधान मुलत: सत्यही असू शकते. [१]
कामचालू [संपादन]
बौद्धिक कृष्णविवर [संपादन]
लोकांची विशीष्ट विचारधारा/मतप्रणालीला बांधीलकी होते आणि माहिती विचारधारा/मतप्रणालीला जुळवून घेण्याकरिता वापरली जाते.[२] विचारधारा/मतप्रणालीला विसंगत माहिती दुर्लक्षीत,सबब ( excuse) देणे अथवा प्रमाणित केली जाते. बौद्धिक कृष्णविवरात सापडलेले लोकांना उपलब्ध माहिती अधिक समजून घेणाऱ्या समजवणाऱ्या नव्या थेअरी मधे रस नसतो कारण त्यांनी त्यांची बांधीलकी विशीष्ट विचारधारा/मतप्रणालीला आधीच झालेली असते.[३]
युक्तिवादाने कोंडी केलीच तर बौद्धिक कृष्णविवरात फसलेल्या व्यक्ति तर्कांबद्दल संशय दर्शवतात.उद्देश कोंडीकरणाऱ्या तर्क आणि युक्तिवादास ती एक निराळी श्रद्धा प्रणाली आहे असे सांगून बोळवण करून स्वतःची सुटका करून घेण्याचा असतो. या क्ऌप्तीत सर्व युक्तिवाद , श्रद्धा , विचारधार एकाच पातळीवर असून equally "reasonable" or "unreasonable" असल्याचा आभास निर्माण केला जातो. [४] .तुमचा विश्वास जेवढा योग्य आहे तेवढाच माझा विश्वास योग्य आहे असे दाखवण्याचा प्रयास करत वेळ मारून नेत स्वतःची हार होताना सुद्धा ताठ मानेने बाहेर पडण्यासा प्रयत्नास Stephen Law न्युक्लीअर बटन म्हणजे शेवटचा सुटकेचा मार्ग म्हणतात ज्यात तत्त्वज्ञानातील प्रॉब्लेमला smokescreen[मराठी शब्द सुचवा] म्हणून वापरले जाते, त्यामुळे त्यांचा तर्कांबद्दल संशय विशुद्ध ठरत नाही. .[५]
विशीष्ट विचारधारेसच बांधीलकी साध्य करण्याकरिता चुकीची बौद्धीक दिशा आणि क्लृप्त्या, कोणत्याही रॅशनल युक्तिवादास दुर्लक्षीत करणे अथवा वळसा घालण्यामुळे कारस्थान संशयवादींचा कोणत्याही रॅशनल चर्चेत सहभाग मिळवण्याचे प्रयत्न करण्यास काहीच अर्थ रहात नाही.[६]
संदर्भ [संपादन]
- ↑ http://www.freerepublic.com/focus/f-news/900422/posts
- ↑ http://stephenlaw.blogspot.in/search/label/creationism
- ↑ http://atheism.about.com/b/2012/02/16/going-nuclear-to-protect-intellectual-black-holes.htm
- ↑ http://atheism.about.com/b/2012/02/16/going-nuclear-to-protect-intellectual-black-holes.htm
- ↑ http://atheism.about.com/b/2012/02/16/going-nuclear-to-protect-intellectual-black-holes.htm
- ↑ http://teampangloss.wordpress.com/2012/05/16/on-the-psychology-of-conspiracy-theorists-and-why-you-wont-win-an-argument-with-one/