तापीबाई टिळक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तापीबाई टिळक या बाळ गंगाधर टिळकांच्या पत्‍नी होत्या. त्यांचे लग्न १८७१ साली झाले होते. लग्नानंतर त्यांचे नाव सत्यभामाबाई असे ठेवण्यात आले. सत्यभामाबाईंचा मृत्यू ०७ जून १९१२ रोजी झाला, त्यावेळी लोकमान्य टिळक ब्रह्मदेशात तुरुंगात होते. [१]तापीबाई यांचे मूळ गाव कोकणातील लाडघर हे होते. टिळकांना तीन मुली आणि विश्वनाथ, रामभाऊ व श्रीधर असे तीन मुलगे होते.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ आचार्य अत्रे यांच्या दुर्वा आणि फुले या लेखसंग्रहातून --- लोकमान्य टिळक (२),http://www.lokmanyatilak.org/index.php/vadmay/lokmnaynvaril-sahitya/lokmanyanvaril/145-acharry-lekh2
  2. ^ टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand6/index.php/23-2015-01-28-09-50-16/11778-2012-01-04-11-05-49?showall=1&limitstart= १७ सप्टेंबर २०१५ रोजी पहिले.