तस्कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


तस्कर (शास्त्रीय नावःElaphe helena)हा भारतीय उपखंडात आढळणारा अतिशय निरुपद्रवी बिनविषारी साप आहे. इंग्रजीत याला ट्रिंकेट अथवा साधा म्हणतात. अतिशय शांत स्वभावाचा हा साप हाताळायला अतिशय सोपा आहे. तस्कर चा मराठीत अर्थ तस्करी अथवा चोरी करणारा. हा लांबीला साधारणपणे १/२ ते १ मीटर पर्यंत असतो. व जाडीला १ इंचापर्यंत असतो. अंगावर पट्टे असतात व पट्टे सुरेख बुद्धीबळातील पटासारख्या छोट्या काळ्या पांढर्‍या चौकोनांनी भरलेले असतात.

अनुक्रमणिका

[संपादन] वावर

हा मुख्यत्वे दक्षिण भारत, श्रीलंका मध्ये आढळतो. महाराष्ट्रातही विपुल प्रमाणात आढळतो, छोटी जंगले, मानवी वस्त्यातील गव्हाणी, आडगळीच्या जागा ह्या आवडत्या जागा आहेत

[संपादन] खाद्य

छोटे उंदीर, पाली, सरडे, पक्ष्यांची अंडी, बेडुक इत्यादी

[संपादन] शत्रु

माणूस, मोठे शिकारी, पक्षी, मुंगुस, मोठे साप इत्यादी


वेटोळ्या घालून बसलेला तस्कर

[संपादन] संदर्भ

  • Book of Indian Reptiles- oxford press by BNHS
वैयक्‍तिक साधने
इतर भाषांमध्ये