डेव्हिड ससून ग्रंथालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेव्हिड ससून ग्रंथालय

डेव्हिड ससून ग्रंथालय भारताच्या मुंबई शहरातील मोठे ग्रंथालय आहे. हे ग्रंथालय शहराच्या मध्यवर्ती भागात कालाघोडाजवळ रॅम्पार्ट रो येथे एलफिन्स्टन कॉलेज, वॉट्सन्स होटेल आणि आरमारी तसेच सैन्यदलाच्या मोठ्या इमारतींच्या अगदी जवळ आहे.

हे ग्रंथालय आल्बर्ट ससून याने आपले वडील डेव्हिड ससून यांच्या नावे बांधले.[१] या इमारतीची उभारणी स्थानिक मालाड यलो स्टोन प्रकारच्या दगडांनी करण्यात आली. या उभारणीस १,२५,००० रुपये खर्च आला, पैकी ६०,००० आल्बर्ट ससूनने तर उरलेला खर्च बॉंबे प्रेसि़डेन्सी सरकारने उचलला.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Sneeha Nair (17 January 2011), "Let Colaba Charm you" Archived 2011-01-20 at the Wayback Machine., Hindustan Times; Retrieved on 25 January 2011.
  2. ^ TIFR Mumbai pages sourced from article by Kaumudi Marathe of Times of India, 12 November 1995.