डॅनियेल पॅट्रिक मॉयनिहॅन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डॅनियेल पॅट्रिक पॅट मॉयनिहॅन (मार्च १६, इ.स. १९२७ - मार्च २६, इ.स. २००३) हा अमेरिकन सेनेटर व समाजशास्त्रज्ञ होता. डेमॉक्रेटिक पक्षाचा सदस्य असलेला मॉयनिहॅन न्यू यॉर्क राज्यातून १९७८मध्ये पहिल्यांदा अमेरिकन सेनेटवर निवडून गेला व १९८२, ८८ आणि ९४ मध्ये पुन्हा निवडला गेला. मॉयनिहॅनने २०००च्या निवडणूकीत उमेदवारी केली नाही.
या आधी मॉयनिहॅन अमेरिकेचा संयुक्त राष्ट्रांकडे व भारतातील राजदूत होता. मॉयनिहॅनने अमेरिकेची सेनेटमध्ये अनेकदा भारताची बाजू उचलून धरली होती.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |