ट्युरिंग पारितोषिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ए.एम. ट्युरिंग पारितोषिक हे असोसियेशन फॉर कम्प्युटिंग मशिनरी या संस्थेतर्फे संगणकीय समाजात तांत्रिक योगदान दिल्याबद्दल दरवर्षी एका व्यक्तीला देण्यात येते. हे योगदान महत्त्वाचे तसेच बऱ्याच काळापर्यंत लागू पडणारे असावे असा संकेत आहे.

इतिहास[संपादन]

हे पारितोषिक ऍलन मॅथिसन ट्युरिंग या ब्रिटिश गणितज्ञाच्या नावे देण्यात येते. ट्युरिंगला संगणकशास्त्राच्या जनकांपैकी एक मानण्यात येते. याला संगणकशास्त्रज्ञांमध्ये नोबेल पारितोषिकाचा मान आहे. इंटेल कॉर्पोरेशनद्वारा सहपुरस्कृत असलेल्या या पारितोषिकाबरोबर १,००,००० अमेरिकन डॉलरचे बक्षिस देण्यात येत होते. २००७ पासून ही रक्कम २,५०,००० अमेरिकन डॉलर करण्यात आली. पहिले ट्युरिंग पारितोषिक १९६६ मध्ये कार्नेजी मेलन विद्यापीठातील एक शिक्षक असलेल्या ऍलन पर्लिस यांना देण्यात आले. इ.स. २००६ मध्ये फ्रांसेस ऍलन ही पारितोषिक मिळविणाऱ्या पहिल्या महिला बनल्या.