टोनी तान केंग याम
टोनी तान केंग याम (सोपी चिनी लिपी: 陈庆炎 ; पारंपरिक चिनी लिपी: 陳慶炎 ; फीनयीन: Chén Qìngyán ; सिंगापुरी रोमनीकरण: Tony Tan Keng Yam ;) (७ फेब्रुवारी, इ.स. १९४०; सिंगापूर - हयात) हा सिंगापुरी राजकारणी, बँकर व गणिती असून सिंगापुराचा विद्यमान ७वा राष्ट्राध्यक्ष आहे. १ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी त्याने अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्याआधी १ जुलै, इ.स. २०११ पर्यंत तो गव्हर्मेंट ऑफ सिंगापूर इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (जीआयसी) या संस्थेचा कार्यकारी संचालक व उप-पदाधिकारी होता, तर सिंगापूर प्रेस होल्डिंग्ज लिमिटेड (एसपीएच) या संस्थेचा पदाधिकारी होता. इ.स. १९९५ ते इ.स. २००५ या कालखंडात तो सिंगापुराचा उपपंतप्रधान होता.
ऑगस्ट, इ.स. २०११ मध्ये झालेल्या सिंगापुराच्या अध्यक्षीय निवडणुकींमध्ये तान उभा राहिला होता[१] व ०.३५% एवढ्या निसटत्या फरकाने जिंकला. १ सप्टेंबर, इ.स. रोजी त्याने सिंगापुराचा ७वा अध्यक्ष म्हणून शपथ घेतली[२].
[संपादन] संदर्भ
- ↑ टोनी तान टू रन फॉर प्रेसिंडेंट (टोनी तान अध्यक्षपदासाठी उभे राहणार). द न्यू पेपर (२३ जुलै, इ.स. २०११). (इंग्लिश मजकूर)
- ↑ टोनी तान इलेक्टेड अॅज सिंगापोर्स सेवन्थ प्रेसिंडेंट (टोनी तान सिंगापुराचा ७वा अध्यक्ष म्हणून निवडला गेला). हिंदुस्तान टाइम्स (२८ ऑगस्ट, इ.स. २०११). (इंग्लिश मजकूर)
[संपादन] बाह्य दुवे
- अधिकॄत चरित्र. सिंगापुराच्या प्रजासताकाच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||||