टी.ए.सी.व्ही. काबो व्हेर्दे एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टी.ए.सी.व्ही. काबो व्हर्दे एअरलाइन्स (पोर्तुगीज: Transportes Aéreos de Cabo Verde) ही पश्चिम आफ्रिकेमधील केप व्हर्दे ह्या देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. प्राइया येथे मुख्यालय असलेल्या टी.ए.सी.व्ही.चा प्रमुख वाहतूकतळ साल ह्या बेटावरील आमिल्कार काब्राल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. युरोपियन संघाने आफ्रिका खंडामधील बव्हंशी विमान कंपन्यांवर बंदी घातली असल्यामुळे आफ्रिकेतून युरोपाला सेवा पुरवणारी टी.ए.सी.व्ही. ही मोजक्या आफ्रिकन कंपन्यांपैकी एक आहे.

लिस्बन पोर्तेला विमानतळावर थांबलेले टी.ए.सी.व्ही.चे बोइंग ७५७ विमान

बाह्य दुवे[संपादन]