टाटा डोकोमो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टाटा डोकोमो ही एक टाटा टेलीसर्व्हिसेस ची भ्रमणध्वनी सेवा आहे. जपान मधील मोठी दुरध्वनी कंपनी एन.टी.टी. डोकोमो (२६% समभाग ) व टाटा समुह (७४ % समभाग) ह्यांच्यात नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या करारानुसार ते संयुक्तपणे "टाटा डोकोमो" ह्या नावाने भ्रमणध्वनी सेवा पुरवितात. हि एक जीएसएम सेवा असून ती प्रिपेड आणि पोस्टपेड ह्या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. सध्या ती भारतातील ११ टेलिकॉम सर्कल (मंडळ) मार्फत कार्यरत आहे ज्यात दक्षिणेतील महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक,केरळ,आंध्रप्रदेश तसेच तमिळनाडू व उत्तर पुर्वेकडिल हरियान, ओरिसा, मध्यप्रदेश, छत्तिसगड, प.बंगाल ह्यांचा समावेश आहे.