झहीर खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(झहिर खान या पानावरून पुनर्निर्देशित)
झहीर खान
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव झहीर खान
उपाख्य झॅक
जन्म ७ ऑक्टोबर, १९७८ (1978-10-07) (वय: ४५)
श्रीरामपुर, महाराष्ट्र,भारत
उंची ६ फु १ इं (१.८५ मी)
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने जलद-मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. ३४
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९९९/००–२००५/६ वडोदरा
२००४ सरे
२००६ वॉर्सस्टशायर
२००६/०७ मुंबई
२००८ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२००९ –१० मुंबई इंडियन्स
२०११ –सद्य रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लिस्ट अ
सामने ७७ २३० १४१ २२३
धावा १०२२ ९७४ २,०५६ ९५८
फलंदाजीची सरासरी १२.७७ १२.८१ १३.९८ १२.९४
शतके/अर्धशतके ०/३ ०/० ०/४ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ७५ ४२ ७५ ४२
चेंडू १५,४५७ ११,४९८ २८,९३९ ११,१६५
बळी २७१ २४७ ५८६ ३१२
गोलंदाजीची सरासरी ३१.८५ २९.४२ २७.३४ २९.३१
एका डावात ५ बळी १० ३२
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ७/८७ ५/४२ ९/१३८ ५/४२
झेल/यष्टीचीत १८/– ५१/– ४२/– ४९/–

२ जानेवारी, इ.स. २०११
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

झहीर खान ( जन्म: ७ ऑक्टोबर १९७८, श्रीरामपूर, महाराष्ट्र) हा भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख डावखुरा वेगवान गोलंदाज आहे.

पुर्वायुष्य[संपादन]

झहीर खान याचे नाव पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू झहीर अब्बास यांच्या नावावरून ठेवण्यात आले. त्याचे टोपण नाव जॅक असे आहे. तो कपिलदेव नंतरचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. झहीर खान हा मध्यम वर्गीय कुटुंबातील आहे. त्याच्या वडिलांचे नाव बख्ख्तीयार खान असे असून ते फोटो ग्राफर आहेत. त्याच्या आईचे नाव झकिया खान असून त्या शिक्षिका आहेत. बॉलीवूड मधील प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सागरिका घाटगे ही झहीर खानची पत्नी आहे. झहीर खानला दोन भावंड आहेत. झहीरच्या क्रिकेट श्रेत्रातील कारकिर्दीस २००० साली सुरुवात झाली. जेव्हा तो पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेला तेव्हा तेथे क्रिकेट क्लब मध्ये जाणे सुरू केले. झहीर खान हा डावखुरा गोलंदाज असून तो कसोटी क्रिकेट मधील ११ व्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज आहे.

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

बाह्य दुवे[संपादन]