जुही चावला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जुही चावला
जन्म जुही चावला
१३ नोव्हेंबर, १९६७ (1967-11-13) (वय: ४६)
अंबाला, हरयाणा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग
कारकीर्दीचा काळ १९८६ - चालू
पती जय मेहता

जुही चावला (जन्म: ११ नोव्हेंबर १९६७) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये तिची गणना होते. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. १९८६ सालच्या सल्तनत ह्या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १९८८ साली आलेला आमिर खानसोबतचा कयामत से कयामत तक हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला व जुही रातोरात सुपरस्टार बनली. तेव्हापासून तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत व तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हिंदीखेरीज जुहीने तेलुगू, तमिळ इत्यादी भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे.

अभिनयाखेरीज जुही चित्रपट निर्मितीमध्ये देखील कार्यरत आहे. तसेच भारतीय प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्स ह्या संघाची ती शाहरुख खानसोबत सह-मालकीण आहे.

चित्रपट यादी[संपादन]

वर्ष चित्रपट टीपा
1986 सल्तनत
1987 प्रेमलोक कन्नड चित्रपट
1988 कयामत से कयामत तक फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार
1988 कलियुग कर्नुडू तेलुगू चित्रपट
1988 परूवा रागम तमिळ चित्रपट
1989 अमर प्रेम बंगाली चित्रपट
1989 चांदनी
1989 किंदरी जोगी कन्नड चित्रपट
1989 विकी दादा तेलुगू चित्रपट
1989 लव्ह लव्ह लव्ह
1989 गुंज
1990 काफिला
1990 स्वर्ग
1990 प्रतिबंध
1990 तुम मेरे हो
1990 जहरीले
1990 शानदार
1990 सी.आय.डी.
1991 शांती क्रांती कन्नड चित्रपट
1991 शांती क्रांती तेलुगू चित्रपट
1991 नट्टक्कू ओरू नल्लावन तमिळ चित्रपट
1991 बेनाम बादशा
1991 कर्ज चुकाना है
1991 भाभी
1992 अपोन पोर बंगाली चित्रपट
1992 बोल राधा बोल
1992 राधा का संगम
1992 राजू बन गया जंटलमन
1992 मेरे सजना साथ निभाना
1992 बेवफा से वफा
1992 दौलत की जंग
1993 लुटेरे
1993 शतरंज
1993 इज्जत की रोटी
1993 आईना
1993 डर
1993 हम हैं राही प्यार के फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
1993 कभी हां कभी ना पाहुणी कलाकार
1994 ईना मिना डिका
1994 द जंटलमन
1994 अंदाज Saraswati
1994 अंदाज अपना अपना पाहुणी कलाकार
1994 घर की इज्जत
1994 भाग्यवान
1994 परमात्मा
1994 साजन का घर
1995 राम जाने
1995 कर्तव्य
1995 नाजायझ
1995 आतंक ही आतंक
1996 तलाशी
1996 लोफर
1996 बंदिश
1996 दरार
1997 येस बॉस
1997 इश्क
1997 मिस्टर ॲन्ड मिसेस खिलाडी
1997 दीवाना मस्ताना
1998 सात रंग के सपने
1998 हरीकृष्णनन्स मल्याळम चित्रपट
1998 डुप्लिकेट
1998 झूट बोले कौवा काटे
1999 सफारी
1999 अर्जुन पंडित
1999 शहीद उद्धम सिंग
2000 गॅंग
2000 कारोबार
2000 फिर भी दिल है हिंदुस्तानी
2001 वन टू का फोर
2001 एक रिश्ता
2001 आमधनी अठन्नी खर्चा रुपय्या
2003 ३ दीवारें
2003 झंकार बीट्स
2004 देस होया परदेस पंजाबी चित्रपट
2005 माय ब्रदर निखिल
2005 पहेली
2005 ७½ फेरे
2006 बस एक पल
2006 वारिस इश्क दा वारिस पंजाबी चित्रपट
2007 सलाम-ए-इश्क
2007 स्वामी
2008 भूतनाथ
2008 क्रेझी ४
2008 किस्मत कनेक्शन
2009 लक बाय चान्स
2011 आय ॲम
2012 मैं कृष्ण हूं
2012 सन ऑफ सरदार
2014 गुलाब गॅंग

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

{[DEFAULTSORT:चावला, जुही}}