जी.जी. परीख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जी. जी. परीख (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे गुजराती-भारतीय डॉक्टर व भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले कार्यकर्ते आहेत.

जीवन[संपादन]

परीख यांचे शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेजात झाले. त्यावेळेस भारताची स्वातंत्र्यचळवळ जोर घेत होती. तत्कालीन अनेक सधन गुजराती कुटुंबांप्रमाणेच परीख घराण्यावरही महात्मा गांधींजींचा प्रभाव होता. परीख यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होत अनेकदा ब्रिटिशविरोधी हरताळांत सहभाग घेतला. यामुळे त्यांना वरळी तुरुंगात कारावास भोगावा लागला. इ.स. १९४२ च्या चले जाव चळवळीत ते युसुफ मेहेरअलींच्या संपर्कात आले. मेहेरअलींच्या वक्तृत्वाने आणि वैचारिक प्रभावाने ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस] पक्षांतर्गत समाजवादी गटाचे सक्रिय कार्यकर्ते बनले.

परीख पेशाने डॉक्टर आहेत.