जाग्वार योद्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जाग्वार वॉरियर या पानावरून पुनर्निर्देशित)
अझ्टेक जाग्वार योद्धा

अस्तेक सैन्यामध्ये गरुड योद्ध्यांप्रमाणेच जाग्वार योद्ध्यांचाही खास विभाग होता (अभिजात नाहुआट्ल: ओकेलोट्ल, इंग्लिश - जाग्वार वॉरिअर किंवा जाग्वार नाईट). गरुड योद्ध्यांप्रमाणेच जाग्वार योद्धे खानदानी लोकांपुरताच मर्यादित होता. मूळात जाग्वार योद्धे आणि गरुड योद्धे हे सैन्यातील खास विभाग ठेवलेला असून, केवळ खानदानी लोकच ह्या विभागासाठी आवश्यक ते शिक्षण घेउन त्या विभागात प्रवेश घेउ शकत असे. त्यांच्या विश्वासानुसार गरुड आणि जाग्वार हे अनुक्र्मे सूर्य आणि चंद्र ह्यांची प्रतीके असल्याने त्यांनी ह्या प्राण्यांना आपले कुलचिन्ह मानले. बहुधा वरील अनुक्रमे कुलचिन्ह असलेले कूळ आपली परंपरा गरुड किंवा जाग्वार योद्धे ह्यांना आवश्यक असे शिक्षण घेउन चालू ठेवीत.

शिक्षण[संपादन]

सगळे अझ्टेक मुलांप्रमाणे तेसुद्धा युद्धकला आणि शस्त्रास्त्रांची महिती शळेत शिकत. काहीही झाले तरी, शेवटी उत्तम विद्यार्थीच जाग्वार वॉरियर बनण्याचे शिकू शके.

१४वे शतक येइपर्यंत अझ्टेक मुलांचे शिक्षण त्यांच्या पालकांच्या हाती असे. त्यानंतर कालपुल्लीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर देखरेख ठेवली जाउ लागली. ठरविक काळानंतर ते त्यांचची परिक्षा घेण्यासाठी प्रार्थनास्थळाकडे लक्ष देऊ लागले.

एज ऑफ एम्पायर ३:द वॉरचिफ इक्स्पॅंसियन मधील जाग्वार प्राउल नाईट

जाग्वार योद्धा बनण्याचा विधि[संपादन]

जो योद्धा तरुण बनल्यनंतर त्यास त्याचा पहिला कैदी पकडणे गरजेचे असते. सामान्यपणे, जाग्वार योद्धा हे नमाभिधान प्राप्त करण्यास त्यांना ४ किंवा ५ कैदी एका लढाईत पकडावे लागते.

सैन्यातील स्थान[संपादन]

जाग्वार योद्ध्यांचा उपयोग मोठ्याप्रमाणावर गुप्तहेरांप्रमाणे केला जाई, त्याचबरोबर युद्ध चालले असता पायदळी सैनिकांप्रमाने त्यांचा उपयोग केल जाई. बहुतेक वेळा मोहिमांच्यावेळी त्यांचा उपयोग केला जाई. ते माक्वाहुइट्ल आणि इतर शस्त्रे वापरीत.

गणवेश[संपादन]

त्यांचा गणवेश त्यांच्या अंगी असलेल्या बळाची आणि लढाईसाठी लागणाऱ्या धैर्याची चिन्हे दर्शविते. त्यांच्या ढाली रंगाने चकचकीत असत, आणि पिसांनी सजावट केलेली असे. ते अंगावर जाग्वारचे कातडे पांघरत, मुख्यत्वेकरून जाग्वारचे डोके आपल्या डोक्यावर ठेवीत.

सिव्हिलिझेशनमधील जाग्वार वॉरियर

शस्त्रास्त्रे[संपादन]

अझ्टेक योद्धे विविध शस्त्रे वापरीत, जसे ऍट्ल-ऍट्ल, धनुष्य, भाले आणि खंजिर. परंतु जाग्वार योद्धे अझ्टेक तलवार - माक्वाहुइट्ल, भाले, सोटे वापरीत. अझ्टेक तलवारसाठी ओबसिडियन धातूंपासून पाते तयार करित, जे पोलादाहून धारधार असे, परंतु तो धारधारपणा फार काळ टिकत नसे. ते उपयोगात आणल्यानंतर लगेच आपला धारधारपणा गमावत.

एज ऑफ एम्पायर २: द कॉंकरर इक्स्पॅंसियनमधील जाग्वार वॉरियर

लोकप्रिय गोष्टींमध्ये....[संपादन]

जाग्वार योद्धा हे व्हिडिओ गेम एज ऑफ एम्पायर २: द कॉंकरर इक्स्पॅंसियन, एज ऑफ एम्पायर ३, मेडिवल टोटल वॉर २ आणि सिव्हिलिझेशन मधले वैशिष्ट्ये आहेत.

एज ऑफ एम्पायर ३ मधील जाग्वार प्राउल नाईट

हेसुद्धा पहा[संपादन]

अझ्टेक सैन्य

मेसोअमेरिकन संस्कृतीमध्ये जाग्वार

गरुड योद्धा

कोयोट योद्धा

सूची[संपादन]

अस्तेक - Aztec(s)

जाग्वार योद्धा - Jaguar Warrior (or) Jaguar Knight

गरुड योद्धा - Eagle Warrior (or) Eagle Knight

कालपुल्ली - Calpulli

माक्वाहुइट्ल - Maquahuitl

ओबसिडियन - Obsidian

जाग्वार - Jaguar

ओकेलोट्ल - ocēlōtl