जांभळा सूर्यपक्षी
| शास्त्रीय नाव | Nectarinia asiatica, Cinnyris asiaticus |
|---|---|
| कुळ | शिंजिराद्य (Nectariniidae) |
| अन्य भाषांतील नावे | |
| इंग्लिश | Purple Sunbird |
| संस्कृत | पुष्पंधय |
| हिंदी | फुलचूही |
अनुक्रमणिका |
[संपादन] आकार
जांभळा सूर्यपक्षी हा अंदाजे १० सें. मी. आकाराचा, चिमणीपेक्षा लहान पक्षी असून वीण हंगामात नर चमकदार निळ्या-जांभळ्या रंगाचा असतो. याच्या पिसाच्या वरच्या भागात शेंदरी रंगाचा एक छोटा पट्टा असतो. इतर काळात नर-मादी दिसायला सारखेच असतात. वरून तपकिरी रंग, खालून फिकट पिवळा, काळे पंख, छातीवर काळा पट्टा.
[संपादन] वास्तव्य
जांभळा सूर्यपक्षी संपूर्ण भारतभर आढळतो शिवाय बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, म्यानमार या देशातही याचे वास्तव्य आहे.
[संपादन] प्रजाती
रंग आणि आकारावरून याच्या किमान तीन उपजाती आढळतात.
[संपादन] आढळस्थान
पानगळीचे जंगल, शेतीचा प्रदेश, माळराने, बागा इ. ठिकाणी जांभळा सूर्यपक्षी हमखास दिसून येतो. फुलातील मध खाण्यासाठी याची चोच लांब व बाकदार असून याची जीभही लांब असते. मधाशिवाय कीटक खाणेही याला आवडते.
[संपादन] प्रजनन काळ
साधारणपणे मार्च ते मे हा यांचा वीण हंगाम काळ असतो, यांचे घरटे लांबट थैलीसारखे, झाडाला किंवा एखाद्या घराच्या आधाराने लटकणारे असते. घरटे गवत, कोळ्याचे जाळे, लाकडाचे छोटे तुकडे यांचे बनलेले असते. मादी एकावेळी २ ते ३ अंडी देते, ही अंडी राखाडी-हिरवट रंगाची व त्यावर तपकिरी ठिपके असतात. मादी एकटीच घरटे बांधण्याचे, अंडी उबविण्याचे काम करते मात्र पिलांना खाऊ घालण्याचे काम नर-मादी मिळून करतात.
[संपादन] चित्रदालन
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |