जस्टिन ट्रुडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जस्टिन पेरी जेम्स ट्रुडो (जन्म: २५ डिसेंबर १९७१) हे कॅनडातील एक राजकारणी आहेत आणि लिबरल पार्टी ऑफ कॅनडा या राजकीय पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. जस्टिन हे मार्गारेट ट्रुडो आणि पुर्व पंतप्रधान पेरी ट्रुडो यांचे जेष्ठ पुत्र आहेत. जस्टिन हे पापिन्यू मतदारसंघातून २००८ मध्ये खासदार म्हणून निवडून आले आणि २०११ मध्ये ते पुन्हा खासदार म्हणून निवडून आले. लिबरल पार्टीच्या नागरिकत्व, परदेशी नागरीकांचे स्थलांतरण, उच्च माध्यमिक शिक्षण, खेळ याविषयी असलेल्या राजकिय विचारांचे ते टिकाकार आहेत. १४ एप्रिल २०१३ रोजी ते लिबरल पार्टी ऑफ कॅनडाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.