जसपाल भट्टी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| जसपाल भट्टी | |
|---|---|
| जन्म | जसपाल सिंग भट्टी मार्च ३, इ.स. १९५५ अमृतसर, पंजाब, भारत |
| मृत्यू | ऑक्टोबर २५, इ.स. २०१२ शाहकोट, जालंधर जिल्हा |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती (चित्रपट व टीव्ही) |
| कारकीर्दीचा काळ | इ.स. १९९० - इ.स. २०१२ |
| भाषा | हिंदी |
| प्रमुख चित्रपट | पॉवर कट - २०१२, मौसम (२०१२) |
| प्रमुख टीव्ही कार्यक्रम | फ्लॉप शो, उल्टा पुल्टा |
| पत्नी | सविता भट्टी |
जसपाल सिंग भट्टी (मार्च ३, इ.स. १९५५ - ऑक्टोबर २५, इ.स. २०१२) हे दूरदर्शनवरील आणि हिंदी चित्रपटांमधील एक हास्यकलाकार होते. आपल्या औपरोधिक विनोदशैलीतून सामान्य माणसाचे होणारे हाल त्यांनी विविध दूरचित्रवाहिनी कार्यक्रमांतून दाखविण्याचा प्रयत्न केला. इ.स. १९८० व इ.स. १९९० च्या दशकातील फ्लॉप शो व उल्टा पुल्टा ह्या दूरदर्शनवरील मालिकांसाठी ते प्रसिद्ध आहेत.[१][२]
संदर्भ [संपादन]
- ↑ "विनोदवीर जसपाल भट्टी यांचे अपघाती निधन", सकाळ, २५ ऑक्टोबर २०१२. (मराठी मजकूर)
- ↑ "विनोदाच्या बादशहावर काळाची क्रूर झडप", लोकसत्ता, २५ ऑक्टोबर २०१२. (मराठी मजकूर)
बाह्य दुवे [संपादन]
- "व्यक्तिवेध : जसपाल भट्टी", लोकसत्ता, २६ ऑक्टोबर २०१२. (मराठी मजकूर)
- इंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील जसपाल भट्टीचे पान (इंग्लिश मजकूर)
- जसपाल भट्टी यांचा अधिकृत ब्लॉग. (इंग्लिश मजकूर)
- जसपाल भट्ठी यांचे अधिकृत संकेतस्थळ. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |