छत्रपती शाहू महाराज टर्मिनस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्ग येथे संपतो. कोल्हापूरातून मुंबई, पुणे, नागपूर इत्यादी महत्त्वाच्या शहरांकडे गाड्या सुटतात. मिरज-कुर्डुवाडी मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर ते सोलापूरहैदराबाद पर्यंत रेल्वे प्रवास शक्य झाला आहे.

कोल्हापूरचे मराठा सम्राट छत्रपती शाहूराजे भोसले ह्यांच्यावरून ह्या रेल्वे स्थानकाचे नाव दिले गेले आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाद्वारे ह्या स्थानकाचे नियंत्रण केले जाते.

प्रमुख रेल्वेगाड्या[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

गुणक: 16°42′10″N 74°14′16″E / 16.7027, 74.2377