छंद (व्याकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(छंद या पानावरून पुनर्निर्देशित)

छंद हा शब्द 'पद्याची घडण' ह्या अर्थानेही वापरतात. या प्रकाराचा वापर मराठी, संस्कृत, पंजाबी, हिंदी, उर्दू भाष़ांत वापर जातो. एखादी कविता कोणत्या छंदात लिहिली आहे असे विचारताना छंद ह्या शब्दाचा वरील अर्थ अभिप्रेत असतो. छंदःशास्त्र हे पद्याच्या म्हणजे लयबद्ध अक्षररचनेच्या घटनेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. पद्याची घडण तपासून छंदःशास्त्र त्यातील आकृतिबंध निश्चित करते. असा आकृतिबंध म्हणजेच छंद होय.

लयबद्धतेची घडण[संपादन]

विविध भाषांत पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना निर्माण करण्याचे मार्ग वेगवेगळे असतात. उदा. संस्कृतासारख्या भाषेत पद्य हे मुख्यत्वे उच्चाराचा कालावधी कमी-अधिक असलेल्या स्वरांच्या विशिष्ट क्रमाने येणाऱ्या रचनेतून निर्माण होते. इंग्रजीसारख्या भाषेत शब्दावयवावर येणारा आघात लय निर्माण करतो. छंदःशास्त्री ह्या असे लयनिर्मितीमागचे निकष शोधून पद्याच्या घडणीची व्यवस्था लावतात.

मराठी छंदांचे रचनालक्ष्यी प्रकार[संपादन]

माधवराव पटवर्धन ह्यांनी आपल्या छंदोरचना ह्या ग्रंथात छंदांची विभागणी पुढील तीन प्रकारांत केली आहे.

  1. वृत्त
  2. जाति (छंद)
  3. छंद

या छंदांचे विस्तृत विवरण संस्कृत - विकिपीडियावर छंद या वर्गात उपलब्ध आहे. त्यात छंदाचे नाव, प्रत्येक पादातील अक्षरसंख्या, छंदाचे लक्षण, गणविवरण आणि उदाहरण एवढ्या बाबींचा समावेश आहे.

छंद या विषयावरील अन्य ग्रंथ[संपादन]

  • छंदःशास्त्रीय समीक्षा (डाॅ. शुभांगी पातुरकर)
  • छंदोमीमांसा (डाॅ. शुभांगी पातुरकर)
  • मराठी मुक्तछंद (डाॅ. शुभांगी पातुरकर)