चेन्नई सेंट्रल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चेन्नई सेंट्रल

चेन्नई सेंट्रल (तामिळ: சென்னை சென்ட்ரல்) हे चेन्नई शहरामधील एक मोठे रेल्वे स्थानक आहे. चेन्नई सेंट्रल हे दक्षिण भारतातील सर्वात वर्दळीचे स्थानक असून येथे दक्षिण रेल्वेचे मुख्यालय स्थित आहे. येथून भारतातील सर्व मोठ्या शहरांकडे प्रवासी गाड्या सुटतात. तसेच चेन्नई उपनगरीय रेल्वेचे देखील चेन्नई सेंट्रल हे सर्वात मोठे केंद्र आहे.

चेन्नई सेंट्रलची इमारत १८७३ साली ब्रिटिशांनी बांधली. आजच्या घडीला १५ प्लॅटफॉर्म असलेले चेन्नई सेंट्रल येथील आधुनिक सुविधांसाठी प्रसिद्ध आहे.


[संपादन] गॅलरी

गुणक: 13°04′56″N 80°16′31″E / 13.08222, 80.27528

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये